Headlines

दुष्काळाने शेतीची कामे खोळंबली; पहिल्या माळेस तुळजापुरात अडीच लाखांवर भाविक:धर्मदर्शनासाठी 6, तर मुखदर्शनासाठी तीन तासांची प्रतीक्षा




शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तब्बल अडीच लाख भाविकांनी हजेरी लावली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या दिवशी भाविकांची संख्या दुपटीने वाढली आहे. रविवारची सुट्टी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीची कामे खोळंबल्याने महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून लाखो भाविक तुळजापुरात दाखल झाले. जयघोषात घटस्थापना रविवारी पहाटे चरणतीर्थ पूजेनंतर देवीची सिंहासनावर विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर तीन मंगल कलशांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, विश्वस्त, मानकरी, पुजारी, भोपे आणि भाविकांच्या उपस्थितीत मंदिरात घटस्थापना झाली. ‘आई राजा उदो उदो’ आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. विधी संपेपर्यंत धर्मदर्शन बंद मंदिरातील परंपरेनुसार घटस्थापनेच्या दिवशी सकाळी विशेष मंत्रानुष्ठान आणि धार्मिक पूजाविधी सुरू असतात. त्यामुळे दुपारी १२ वाजता घटस्थापना होऊन पुढील विधी संपेपर्यंत (दुपारी ४ वाजेपर्यंत) धर्मदर्शन बंद ठेवण्यात आले होते. घटस्थापनेच्या दिवशी आलेला रविवार आणि मराठवाड्यासह सीमाभागात पावसाअभावी शेतीची कामे ठप्प असल्याने ग्रामीण भागातील भाविक मोठ्या संख्येने पहिल्याच दिवशी दर्शनासाठी बाहेर पडले. माहूरगडावर रेणुका मातेला पैठणीचा श्रृंगार नांदेड | माहूरगडावरील श्री रेणुका माता मंदिरात नवरात्रोत्सवाचा प्रारंभ झाला. सकाळी ११ वाजता मंत्रोच्चारांच्या गजरात श्री रेणुका मातेच्या महापूजेला सुरुवात झाली. सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी देवीच्या मुख्य गाभाऱ्यात विधिवत घटस्थापना करण्यात आली. पहिल्या दिवशी श्री रेणुका मातेला पौराणिक अलंकारांनी सजवण्यात आले होते. देवीला पिवळ्या आंबा रंगाची पैठणी महावस्त्र म्हणून परिधान करण्यात आली होती. कोल्हापुरात एक लाख ३७ हजार भाविक कोल्हापूर|करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात परंपरेप्रमाणे घटस्थापना विधी झाला. मानाच्या तोफेची सलामी देऊन शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात झाली. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आई अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून १ लाख ३७ हजार भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने सांगितले. दर्शनरांगांमध्ये प्रचंड खोळंबा धर्मदर्शन : भाविकांना दर्शनासाठी ६ तासांहून अधिक काळ ताटकळावे लागल्याचेही समोर आले.
मुखदर्शन : मुखदर्शनाची रांग ३ तास चालली. पहाटे ५ वाजता रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना सकाळी १० वाजता दर्शन मिळाले.
सशुल्क (पेड) दर्शन: नियोजित वेळेपेक्षा २ तास उशिरा, दुपारी १ वाजता हे दर्शन सुरू झाले. यासाठीही भाविकांना दीड तास प्रतीक्षा करावी लागली.
तुळजाभवानी मातेची अंलकार पूजा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *