![]()
केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी दादरमध्ये मोठा तणाव निर्माण झाला. मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारत आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केल्याने ज्युनियर ठाकरे बंधू (आदित्य आणि अमित) आक्रमक झाले. दोघेही थेट पोलिसांच्या गाडीच्या टपावर चढले. या हायव्होल्टेज ड्राम्यामुळे संपूर्ण दादर परिसरात काही काळ अभूतपूर्व तणाव होता. दोन्ही पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवरताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. ठाकरेंनी अडवल्या पोलिस व्हॅन सीजेपी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेना भवनाबाहेर जमले होते. पोलिसांनी या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केल्यावर आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे तातडीने रस्त्यावर उतरले. ताब्यात घेतलेल्या शिवसैनिकांना सोडल्याशिवाय पोलिसांची गाडी पुढे जाऊ देणार नाही, असा पवित्रा आदित्य ठाकरेंनी घेतला आणि ते स्वतः पोलिसांच्या गाडीवर चढले. यामुळे सेना भवनाबाहेर प्रचंड गर्दी जमली. महाराष्ट्र हे दिल्ली नाही- अमित शिवाजी पार्क परिसरात मनसेचे नेते अमित ठाकरे व संदीप देशपांडे यांना पोलिसांनी अडवले. कार्यकर्ते, मुलींवर विनाकारण हात उचलला जात असल्याचा आरोप करत अमित ठाकरेंनी शिवाजी पार्क पोलिस ठाणे गाठून अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. ‘महाराष्ट्रातही आता दिल्लीसारखी स्थिती निर्माण केली जात आहे,’ असा संताप त्यांनी व्यक्त केला. ‘अटक केलेल्यांना सोडत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही, ’ असे आव्हानही त्यांनी दिले. सोमवारी ठाकरे गट, मनसेचे आंदोलन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका घेत मनसे आणि शिवसेनेने सोमवारी शिवाजी पार्क येथे आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील लढा पुढेही सुरू राहील, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.
Source link
शिवाजी पार्कमध्ये आदित्य-अमित ठाकरे यांचे आंदोलन:मुंबईमध्ये ज्ञानेश कुमारांविरोधात उद्धवसेना-मनसेची तीव्र निदर्शने; पोलिसांकडून आंदाेलकांची धरपकड