Headlines

पैठणमध्ये शनी अमावास्या महोत्सव उत्साहात:हजारो भाविकांची उपस्थिती, भगवान मुनीसुव्रतनाथ यांचा महामस्तकाभिषेक; विविध धार्मिक विधी‎




पैठण नगरीत शनी अमावस्येनिमित्त शनी ग्रह अरिष्ट निवारक श्री १००८ मुनीसुव्रतनाथ भगवान यांचा महामस्तकाभिषेक महोत्सव शनिवारी भक्तिमय वातावरणात पार पडला. सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यांतून हजारो जैन भाविकांनी मोठी उपस्थिती लावली होती. महोत्सवादरम्यान सकाळपासूनच भगवान मुनीसुव्रतनाथ यांच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नांदेडचे प्रवीण कासलीवाल, सुरतचे सुरेश पहाडिया, हैदराबादचे अमित जैन बाराबंकिवाले आणि प्रवीण पहाडे यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. आचार्य श्री प्रसन्नसागरजी महाराज आणि आचार्य श्री गुप्तिनंदीजी मुनी महाराज यांच्या पावन आशीर्वादाने पूजन, धार्मिक विधी आणि भव्य महामस्तकाभिषेक सोहळा अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष महावीर बडजाते, विलास पहाडे, विजय पापडीवाल, जयकुमार बाकलीवाल, प्रमोद कासलीवाल, मनोज काला, रायचंद भुस, प्रकाश कासलीवाल, कैलास पाटणी, किशोर भाकरे, सुमित गंगवाल, डॉ. संजय गंगवाल, डॉ. राजेंद्र काला, स्वदेश पांडे, अभिजीत काला यांच्यासह युवक मंडळ, महिला मंडळ आणि विश्वस्त मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. दिवसभर चाललेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण पैठण नगरी भक्तिभावाने दुमदुमून गेली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *