.


नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आठ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीचे सावट असले, तरी सण-उत्सवाच्या परंपरेमुळे बाजारपेठेत खरेदीचा उत्साह आहे. सोने-चांदीसह रिअल इस्टेट, किराणा व्यापाऱ्यांच्या अंदाजानुसार वैजापूर, गंगापूर, पैठण, खुलताबाद, सिल्लोड, सोयगाव, कन्नड या तालुक्यांमध्ये अंदाजे ९० कोटी २५ लाख रुपयांची नवरात्रोत्सवामध्ये उलाढाल होण्याचा अंदाज आहे. अनेकांनी दुचाकीसह चारचाकी वाहनांची बुकिंग केली असून, विजयादशमीच्या मुहूर्तावर वाहने घरी नेण्याचे नियोजन केल्याचे शोरूम चालकांनी सांगितले.
तालुकानिहाय विचार करता, सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक ३५ ते ४० कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे, तर गंगापूर तालुक्यात २६ कोटी, पैठण तालुक्यात १५ कोटी, वैजापूर तालुक्यात ९.५ कोटी आणि कन्नड तालुक्यात ९.५ कोटींची उलाढाल होणार आहे. दुसरीकडे, फुलंब्री तालुक्यात दुष्काळाची भीषणता जास्त असल्याने तिथे सर्वात कमी म्हणजेच केवळ ९० लाखांचा व्यवसाय घटस्थापनेच्या दिवशी झाला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सोने-चांदी (३० कोटी) सणांमुळे दागिने खरेदीकडे ग्राहकांचा कल. ऑटोमोबाइल (१२ कोटी ५० लाख) विजयादशमीच्या मुहूर्तावर वाहने खरेदीला पसंती. रिअल इस्टेट (२३ कोटी ५० लाख) नवरात्रोत्सवात प्लॉट, फ्लॅट, गृहप्रवेश होतील. कपडा, होम अप्लायन्सेस व किराणा (२८ कोटी ७० लाख) आर्थिक गुंतवणूक (८ कोटी ५० लाख) एफडी, विमाकवच, एसआयपीमध्ये गुंतवणूक. ८२० सार्वजनिक देवी मूर्ती स्थापना ०८ ठिकाणी देवीची मंदिरे १२० मंडळांकडून रास दांडिया १५०० पोलिसांचा राहणार बंदोबस्त Ãदुष्काळाने खरेदीवर परिणाम असला, तरी नवरात्रोत्सवामुळे बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. खरेदीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. -शांतिलाल पहाडे, वैजापूर Ãकन्नड शहरात सोने, चांदीची खरेदी वाढणार असल्याची शक्यता आहे. त्यानुसार सराफांनी तयारी केली आहे. सण असल्याने याच काळात नवीन वस्तू खरेदीस प्राधान्य दिले जाते. – गोपाल वर्मा, कन्नड Ãपैठण तालुक्यातील अनेकांनी दुचाकींची बुकिंग आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर दुचाकी घरी नेण्याचे नियोजन असून, तयारी पूर्ण झाली आहे. – अमोल कुलकर्णी, शोरूम चालक. पैठण