Headlines

एसपी चौकातील जीवघेणा खड्डा एक महिना होऊनही बुजवण्याकडे दुर्लक्ष:वाहतूक पाेलिसांनी लावले बॅरिकेट्स, बांधकाम विभागाला अद्यापही‎



शहरातील सर्वाधिक वाहनांची वर्दळ आणि रहदारी असलेल्या पोलिस अधीक्षक (एसपी) चौकात गेल्या दीड महिन्यापासून पडलेला मोठा खड्डा अपघाताला निमंत्रण देत आहे. तारकपूरकडून आल्यानंतर चौक ओलांडताच भिंगारकडे जाणाऱ्या रस्त्यावर अगदी चौकाच्या मधोमध हा खड्डा पडला आहे.

.

खड्ड्यात वाहनांची चाके जाऊन मोठा अपघात होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांनी तात्पुरता उपाय म्हणून खड्ड्याभोवती बॅरिकेट्स उभे केले आहेत. त्यामुळे चारचाकी व दुचाकी वाहनधारकांना या बॅरिकेट्सला वळसा घालून पुढे जावे लागत आहे. परिणामी, चौकातील वाहनांची गती मंदावून सतत वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.

याच रस्त्याच्या डाव्या बाजूला पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हा सत्र न्यायालय, न्यायनगर आणि पोलिस अधिकाऱ्यांची वसाहत आहे, तर उजव्या बाजूला लष्करी परिसर आहे. पुढे हा रस्ता मुकुंदनगर, बुऱ्हाणनगर, आगडगाव, भिंगार आणि पाथर्डीला जोडणारा मुख्य मार्ग आहे. त्यामुळे दिवसभर या चौकातून हजारो वाहनांची ये-जा सुरू असते.

शहरातील विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, नागरिक, तसेच वकील, वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि न्यायाधीशांची वाहनेही याच मार्गाने रोज जातात. तरीही या महत्त्वाच्या चौकातील खड्ड्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व संताप व्यक्त केला जात आहे.

: वाहतुकीचा ताण व अपघाताचा धोका या चौकातून दररोज साधारणपणे १५ ते २० हजार वाहने जातात. चौकाच्या मधोमध खड्डा असल्याने विशेषतः रात्रीच्या वेळी आणि दुचाकीस्वारांसाठी (ब्रेक मारताना घसरून पडणे) हा खड्डा जीवघेणा ठरू शकतो. तसेच वाहतूक मंदावल्याने दररोज इंधनाचा होणारा अपव्यय आणि चौकातील सिग्नल सायकल बिघडल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *