![]()
संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन श्रीरामपूर शहराचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी मिल्लतनगर येथील साठवण तलावाचे विस्तारीकरण सुरू आहे. पूर्वीच्या १६ एकरांऐवजी आता ३६ एकर क्षेत्रावर हा नवीन तलाव साकारत असून, त्यात ९.
.
नगराध्यक्ष ससाणे, सभापती योगेश जाधव आणि पाणीपुरवठा अधिकारी निलेश बकाल यांनी तलावाच्या कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तलावाच्या खोदाईचे काम पूर्ण झाले असून, सध्या भिंती उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. तलावाच्या भिंतींची उंची १०.५५ मीटर आहे.
प्रत्यक्षात ८.५ मीटरपर्यंत पाणीसाठा केला जाणार आहे. या कामासाठी सुमारे २८०० टन स्टील आणि २७ हजार ५०० घनमीटर काँक्रीट लागणार आहे.
नवीन तलावामुळे पुढील २५ वर्षांची पाण्याची गरज भागविण्यास मदत होणार आहे. तलावाभोवती सुमारे दीड किलोमीटरचा ट्रॅक तयार करून सुशोभीकरण केल्यास नागरिकांसाठी नवे आकर्षण निर्माण होऊ शकते. मात्र, जुलै २०२७ पर्यंत उपलब्ध पाणीसाठा पुरविण्याचे आव्हान शहरासमोर आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे.
जुलै २०२७ पर्यंत पाणी पुरविण्याचे आव्हान पाऊस लांबण्याची शक्यता आणि धरणातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता जुलै २०२७ पर्यंत शहराला पाणी पुरविण्याचे आव्हान आहे. सध्या पालिकेकडून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हामुळे साठवण तलावातील पाण्याचे बाष्पीभवनही होत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा.
६२ बोअरमधून पुरवठा; ४ बोअर टँकरसाठी पालिकेच्या ६२ बोअरमधून विविध भागांत पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याचा नियोजनबद्ध वापर व्हावा यासाठी बोअर सुरू ठेवण्याच्या वेळा निश्चित करण्याचे नियोजन आहे. उर्वरित चार बोअरमधील पाणी छोट्या टँकरद्वारे पुरविण्याचा विचार असून, नळाद्वारे पाणी पोहोचत नसलेल्या भागांना प्राधान्य दिले जाणार आहे.