![]()
शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त पाइपलाइन रोड येथील श्री तुळजाभवानी माता मंदिरात धार्मिक उत्साहात आणि मंगलमय वातावरणात घटस्थापना व महाअभिषेक सोहळा पार पडला. तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य व त्यांची पत्नी स्वाती वैद्य यांच्या हस्ते विधि
.
वैद्य म्हणाले, आपले सण-उत्सव आनंदाने, उत्साहाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरे करावेत. आपल्या सण-उत्सवांमधून भारतीय संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जपला जातो. हा नवरात्रोत्सव शांततेत, भक्तिभावाने आणि धार्मिक परंपरेनुसार साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले. मंदिराचे संस्थापक अशोक कानडे म्हणाले, पाइपलाइन रोड येथील श्री तुळजाभवानी माता मंदिरात गेल्या अनेक वर्षांपासून शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाही विविध भजनी मंडळांचे भजन, श्री दुर्गा सप्तशती पाठ, देवीची पालखी मिरवणूक, नृत्यदर्पण संस्थेच्या अपर्णा थत्ते यांचा भरतनाट्यम् कार्यक्रम, कुंकुमार्चन सोहळा, सुवासिनी पूजन, नवचंडी महायज्ञ, अष्टमी होम आणि कुमारिका पूजन असे विविध कार्यक्रम होणार आहे. दसऱ्याच्या दिवशी हिंदू धर्मसभा तसेच ‘शिवशंभू धर्मरक्षक’ पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्राम जगताप व माजी खासदार डॉ. सुजय विखे उपस्थित राहणार आहेत.