Headlines

ग्राहकांच्या विश्वासामुळेच खामगाव अर्बन बँकेची प्रगती:अध्यक्ष प्रा. डॉ. विजय पुंडे; इंडस्ट्रीज उभारणीत बँकेचे योगदान‎



परिसरातील बहुतांश उद्योगांना वित्त पुरवठा करणाऱ्या खामगाव अर्बन बँकेचे सभासद, ग्राहक खातेदार, उद्योजक व हितचिंतक यांचा बँकेवर अतूट विश्वास आहे. विश्वासाच्या या नात्यामुळे बँकेची प्रगती होत असून भविष्यातही याच विश्वासाच्या बळावर प्रगतीची उंच शिखर गाठण

.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा संघचालक बाळासाहेब काळे, तालुका संघचालक संतोष देशमुख, बँकेचे ज्येष्ठ सभासद खातेदार टिबडेवाल उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. विजय पुंडे होते. तर मंचावर बँकेचे उपाध्यक्ष डॉ. सतीश कुळकर्णी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर पाटील उपस्थित होते. यावेळी जिल्हा संघचालक बाळासाहेब काळे यांनी विश्वासाचे नाते जपत खामगाव अर्बन बँकेचे संचालक मंडळ सदस्य तथा सर्व कर्मचारी वर्ग सदैव ग्राहकांच्या सेवेकरता तत्पर असल्याचे सांगितले.

यावेळी डॉ. राजेश राजोरे, माजी संचालिका विद्या देशमुख,राजेंद्रसिंह राजपूत यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास बँकेच्या संचालिका फुलवंती कोरडे, मनीषा माटे, तज्ञ संचालिका सी.ए. मीना देशमुख, व्यवस्थापन मंडळ सदस्य मोहनराव हसबनिस, अशोक आयलाणी, संतोष देशमुख, नंदू काळे, ॲड.अमोल डाहाके, इंगळे, प्रकाश हातेकर, अरविंद ताम्हण, सतीश विभुते, कृष्णराव देशमुख, शेखर कुळकर्णी, दीपक धिवार, संदीप भावसार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मुख्य शाखेचे शाखाधिकारी नरेंद्र देशपांडे यांनी तर बोर्ड सचिव राजू जुनारे यांनी आभार मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *