Headlines

ज्ञानेश कुमार घरी जात नाहीत, तोपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही:हर्षवर्धन सपकाळांचा इशारा, मुख्य निवडणूक आयुक्तांवर देशद्रोहाचा खटला चालवून अटकेची मागणी




मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह त्यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. मतदार याद्या, मतदान प्रक्रिया, मतमोजणी आणि ईव्हीएमबाबत सपकाळ यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसचे आंदोलन गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू राहील, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले. ‘हे आंदोलन राजकीय नाही, संविधान वाचवण्यासाठी आहे’ जिल्हा आणि राज्य पातळीवर काँग्रेसची आंदोलने सुरू असल्याचे सांगत सपकाळ म्हणाले की, हे आंदोलन केवळ मतांचे किंवा राजकारणाचे आंदोलन नाही. संविधानाचे आणि लोकशाहीचे रक्षण करणे, तसेच निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडाव्यात, हा यामागील उद्देश आहे. निवडणूक प्रक्रियेत कथित मतचोरी झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. ज्ञानेश कुमार यांना अटक करण्याची मागणी ज्ञानेश कुमार यांनी केलेल्या कथित कृतींचा उल्लेख करत सपकाळ यांनी त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला चालवण्याची आणि तातडीने अटक करण्याची मागणी केली. निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत, या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. ‘गल्लीपासून दिल्लीपर्यंत आंदोलन सुरू राहणार’ काँग्रेसचे आंदोलन एका दिवसापुरते मर्यादित नसल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले. विविध स्तरांवर पक्षाची आंदोलने सुरू असून, दिल्लीतील आंदोलन हा त्याचाच एक भाग आहे. आंदोलन पुढे कसे सुरू ठेवायचे, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे त्यांनी सांगितले. सत्याग्रह करण्याचा अधिकार बजावू दिला जातो की सरकारकडून अडथळे आणले जातात, यावरही पुढील भूमिका अवलंबून असेल, असे ते म्हणाले. मालाडमधील गरबा प्रवेशाच्या अटीवरून भाजपवर टीका मुंबईतील मालाड येथे गरबा महोत्सवात कपाळावर गोमूत्रमिश्रित कुंकवाचा टिळा लावल्यानंतरच प्रवेश दिला जात असल्याच्या प्रश्नावरही सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली. संविधानातील नियम आणि सांस्कृतिक परंपरा यांचा विचार करून वागले पाहिजे, असे ते म्हणाले. समाजात फूट पाडून राज्य करण्याची भूमिका भाजपची असल्याचा आरोप त्यांनी केला. देशभरात लोकशाहीच्या रक्षणासाठी प्रयत्न सुरू असताना जातीयवादाच्या माध्यमातून नागरिकांमधील एकता बाधित करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी म्हटले. ‘मतदार याद्यांपासून ईव्हीएमपर्यंत प्रश्न गंभीर’ मतदार याद्या, मतदान प्रक्रिया, मतमोजणी आणि ईव्हीएम या सर्व बाबींवर संशय निर्माण झाला असल्याचे सपकाळ यांनी म्हटले. निवडणूक आयोग चुकीच्या पद्धतीने वागल्याचा आरोप करत, या प्रकरणात सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. ज्ञानेश कुमार यांच्याशी संबंधित कथित प्रकरणांवर कारवाई होईपर्यंत आणि निवडणूक प्रक्रियेबाबतचे प्रश्न निकाली निघेपर्यंत काँग्रेस आंदोलन सुरू ठेवेल, असा इशाराही त्यांनी दिला. हेही वाचा.. विजय वडेट्टीवारांचा ‘चलो दिल्ली’चा नारा:राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी
देशात मतचोरी झाल्याचा गंभीर आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात त्यांनी ‘चलो दिल्ली’चा नारा दिला असून, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. सविस्तर वाचा विरोधकांचा आज CEC विरोधात SC पर्यंत मार्च: CJIचा राहुल-खरगेंना भेटण्यास नकार, दोघांनी मागितली होती वेळ; 6 मेट्रो स्टेशन बंद मतदानातील फेरफार किंवा मते चोरल्याच्या आरोपांविरोधात निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेस आणि ‘इंडिया’ (INDIA) आघाडीतील इतर विरोधी पक्ष आज सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा काढणार आहेत. काँग्रेसने या आंदोलनाला ‘चलो दिल्ली – लोकशाहीसाठी मोर्चा’ (Chalo Delhi – March for Democracy) असे नाव दिले आहे. विरोधी पक्षांचे नेते दुपारी १:३० वाजता कनॉट प्लेस-बाराखंबा रोड जंक्शन येथे एकत्र जमणार आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवेदन सादर करण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश (CJI) यांच्याकडे रविवारी भेटीची वेळ मागितली होती. मात्र, सरन्यायाधीशांनी राहुल गांधी यांना भेटण्यास नकार दिला. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांनी असे सांगितले की अशाच प्रकारची प्रकरणे आधीच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *