![]()
माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि शाळा यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ करत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोसपुरी येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प केला. विशेष म्हणजे, ‘मिशन आपुलकी’ उपक्रमांतर्गत शाळेसाठी सुमारे ५० हजार रुपये खर्चाच्या गेट-कमानीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त विस्तार अधिकारी चंद्रकांत सोनार होते. यावेळी केंद्रप्रमुख नितीन दळवी, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रेश्मा बेग, उपसरपंच मीना भालेराव, सरपंच करीम बेग, माजी सरपंच मुबारक पठाण, माजी सरपंच सोमनाथ हारेर, अर्जुन आव्हाड, अंबादास देवकर, आसाराम वाघमोडे, बाळासाहेब देवकर आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या ‘मिशन आपुलकी’ उपक्रमांतर्गत चंद्रकांत सोनार यांनी शाळेसाठी सुमारे ५० हजार रुपये खर्चाचे आकर्षक प्रवेशद्वार व कमान उभारून देण्याचे जाहीर केले. या घोषणेनंतर कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. शाळेच्या परिसराचे सुशोभीकरण, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा आणि भौतिक विकासासाठी भविष्यातही सहकार्य करण्याची तयारी माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी दर्शविली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा मुरकुटे यांच्यासह शिक्षक बाळासाहेब कदम, भीमराज आव्हाड, संजय जाधव, मनोज काशीद, उषा कडूस, पद्मिनी चौधरे आणि रुबीना तडवी यांनी परिश्रम घेतले. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेशी जोडण्याचा आणि शाळेच्या विकासात त्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला. यावेळी काही माजी विद्यार्थ्यांनी मनोगतेही व्यक्त केली. यावेळी गावातील नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील नागरिकांनीही या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांना दिला जुन्या आठवणींना उजाळा माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या जडणघडणीत शाळेचे योगदान अधोरेखित केले. ‘ज्या शाळेने आपल्याला घडविले, त्या शाळेसाठी आपणही काहीतरी देणे लागतो,’ या भावनेतून शाळेच्या विकासासाठी योगदान देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक आणि शिक्षक यांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देता येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. शाळेच्या परिसराचे सुशोभीकरण, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा आणि भौतिक विकासासाठी भविष्यातही सहकार्य करण्याची तयारी माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी दर्शविली. यावेळी काही माजी विद्यार्थ्यांनी मनोगतेही व्यक्त केली. यावेळी गावातील नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
शाळेच्या विकासासाठी सरसावले ग्रामस्थ अन् माजी विद्यार्थी:खोसपुरी येथील माजी विद्यार्थी मेळाव्यात संकल्प व्यक्त, माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा