Headlines

एआय शिक्षकाची जागा घेऊ शकत नाही; पूरक साधन म्हणून वापरा:प्रा. डॉ. हाफिजा खान यांचे प्रतिपादन, मानवी विचारशक्ती, एआयच्या संतुलनावर तज्ज्ञांचा भर‎



कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) अनेक फायदे असले, तरी त्याचे तोटेही लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासकांनी एआयचा वापर सावधपणे करावा. एआय शिक्षकाची जागा घेऊ शकत नाही; मात्र अध्यापनासाठी उपयुक्त साधन ठरू शकते. एआय आणि मानवी विचा

.

के. जे. सोमैया

महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षातर्फे ‘रिमॅजिनिंग हायर एज्युकेशन : इनोव्हेशन अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर अ ट्रान्सफॉर्मेटिव्ह फ्युचर’ या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटन सत्रात त्या बीजवक्त्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विजय ठाणगे होते.

सध्याच्या शिक्षणपद्धतीचा नव्याने विचार करण्याची वेळ आली आहे. विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापकांनी एआयचा वापर संयमाने करताना संशोधन, चिंतन आणि वाचन सुरू ठेवावे, असे डॉ. ठाणगे यांनी सांगितले. बोडोलँड विद्यापीठाच्या प्रा. डॉ. इबेमचा चानू यांनी सर्जनशीलता आणि अनुभव ही मानवी बुद्धिमत्तेची बलस्थाने असल्याचे सांगितले.

एआय माहिती देऊ शकते; मात्र तिचा योग्य वापर करण्याची जबाबदारी माणसाची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

नेपाळ येथील त्रिभुवन विद्यापीठाचे डॉ. ताराप्रसाद उपाध्याय यांनी एआयसोबतच ऋग्वेद आणि यजुर्वेद यांसारख्या प्राचीन ग्रंथांतील विचार आजच्या संदर्भात समजून घेण्याची गरज व्यक्त केली. या ग्रंथांमध्ये नैतिकता, कर्तव्य, जबाबदारी आणि सामाजिक उत्तरदायित्व या मूल्यांवर भर देण्यात आला आहे. हीच मूल्ये आजच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्स, ईएसजी आणि सीएसआरमध्येही दिसून येतात. त्यामुळे एआयचा वापर करताना प्राचीन मूल्ये आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा समन्वय साधल्यास जबाबदार आणि समाजहितकारक भविष्य घडवता येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी नेपाळ येथील त्रिभुवन विद्यापीठाचे प्रा. लक्ष्मण भंडारी आणि नवी मुंबई येथील डॉ. हर्षा गोयल यांनीही विचार मांडले. डॉ. बैरागी, डॉ. संतोष पगारे, डॉ. गणेश चव्हाण आणि डॉ. संजय अरगडे यांनी सत्राध्यक्ष म्हणून मार्गदर्शन केले.

उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. गणेश शिंदे यांनी केले. परिसंवादाचे संयोजक डॉ. रवींद्र जाधव यांनी स्वागत केले. सहसंयोजक डॉ. निलेश पोटे यांनी आभार मानले, तर प्रा. नेहा गुरावे यांनी सूत्रसंचालन केले.

रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे, डॉ. जिभाऊ मोरे, डॉ. वसुदेव साळुंके, डॉ. सुरेश देवरे, डॉ. नामदेव ढोकळे, प्रा. सदाशिव नागरे, डॉ. नितीन शिंदे, डॉ. संजय दवंगे आणि प्रा. सचिन जाधव यांनी परिसंवादाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *