![]()
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावा, यासह अन्य मागण्यांसाठी काँग्रेससह अन्य विरोधकांनी दिल्लीत सुरू केलेल्या आंदोलनानंतर भाजपने सोमवारी जेएनयूमधील प्रकरणावरुन काँग्रेस नेत्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. भाजपने दिल्लीतील जेएनयूमधील ११ निष्पाप विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप होऊन काँग्रेसच्या एका खासदाराला सेवेतून बडतर्फ केले असतानाही राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी गप्प का, असा सवाल करत भाजप महिला आघाडीने जनआंदोलन केले. ज्ञानेश कुमार यांनी मतदार याद्यांच्या एसआयआर प्रक्रियेतील कथित अनियमितता दूर करून निवडणूक आयोगाच्या कामकाजात पारदर्शकता व निष्पक्षता सुनिश्चित करण्याची मागणी करण्यात येत असून दिल्लीत या मागणीसह विरोधक आंदोलन करत आहेत. दरम्यान सोमवारी भाजपने काँग्रेसवर जेएनयूमधील शोषण प्रकरणावरून हल्लाबोल केला. यावेळी महापौर शारदा खेडकर, अर्चना शर्मा, सुनीता अग्रवाल, वैशाली शेळके, जयश्री फुंडकर, चंदा शर्मा, गायत्री घुगे, मनीषा बन्साली, शिल्पा वरोकार, अनिता गिरी, आरती घोगलिया, अनिता चौधरी, तसलीम बोरिंगवाला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आरोपी खासदाराचा तात्काळ राजीनामा घेऊन काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करा. गृहमंत्री अमित शाह यांनी बीएनएसअंतर्गत तात्काळ एफआयआर दाखल करून कडक कारवाई करावी, आदी मागण्या या आंदोलकांनी केल्या. “जवाब दो, जवाब दो! राहुल, सोनिया, प्रियंका गांधी जवाब दो’, अशा घोषणा देत भाजप महिला आघाडीने हल्लाबोल आंदोलन केले. राहुल गांधी यांचे छायाचित्र असलेल्या फलकावर चपला मारण्यात आल्या. आंदोलन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाट्यगृहासमोर करण्यात आले. “लडकी हूँ, लड सकती हूँ’चा पोकळ नारा देणाऱ्या प्रियंका गांधी आपल्याच खासदाराने केलेल्या शोषणावर मौन का बाळगून आहेत, ११ पीडित मुलींसाठी त्या कधी उभ्या राहणार, राहुल गांधींच्या ‘मोहब्बत की दुकान’मध्ये हेच शिकवले जाते का? असा सवाल महिला पदाधिकाऱ्यांनी केला.
Source link
जेएनयूतील घटनेवरून भाजप महिला आघाडीने केले "जवाब दो' आंदोलन:दिल्लीतील आंदाेलनाचे पडसाद; खासदारावरून विचारला काँग्रेसला जाब