![]()
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर तसेच कोळेगाव परिसरात पूल बांधणी आणि रस्ता रूंदीकरणाचे काम चालू आहे. तेथे बॅरिकेड, दिशादर्शक फलक न लावल्यामुळे वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने सावळेश्वर व कोळेगावजवळ कार व ट्रक उलटली. यामध्ये चौघे जण बचावले. याबाबतची अधिक माहिती अशी, ठाकरे सेनेचे कोळेगाव विभागप्रमुख सागर गायकवाड हे कारने (एमएच १४ डीएक्स ००४१) मोहोळकडे जात होते. सकाळी ९.३० वाजता मोहोळ तालुक्यातील कोळेगांव जवळ येताच तिथे मोठा खोदलेला रस्ता दिसला तिथे बॅरिकेड नव्हते, रस्ता बाजूने खोदला असून, रुंदीकरणाचे काम चालू आहे, असा फलक नाही. खड्डा पाहून चालकाने अचानक ब्रेक मारल्याने गाडी तीन वेळा उलटली. त्यात ते व त्यांचे सहकारी किरकोळ जखमी झाले. तसाच प्रकार सावळेश्वर येथेही ३० सप्टेंबर रोजी घडला. येथे खड्ड्याचा ट्रक (आरजे १० जीसी ००३५) गेल्याने उलटली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र अपघात घडत असल्याने काळजी घेण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. अपघातात एक ठार, त्यानंतर महामार्गाने बुजवला खड्डा सावळेश्वर येथे ६ ऑक्टोबर रोजी एका २५ वर्षीय तरुणाचा अरुंद पुलावरील खड्डा चुकवताना अपघात झाला. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्या पाठोपाठ कोळेगाव येथे हा अपघात घडला. यात एक जण जखमीही झाला. निष्काळजीपणामुळे अपघात होत आहेत या कामाबाबत ठेकेदाराने काळजी घेतलेली नाही. वाहने वेगाने असतात याचा विचार करत काम सुरू असल्याचे दिशादर्शक फलक लावलेले पाहिजेत., अशा स्थितीत आम्ही सुदैवाने बचावलो पण रात्रीच्या वेळी झाले तर एखाद्याचा जीव जाईल. संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराने सुधारणा करावी. सागर गायकवाड, ठाकरे सेना कोळेगाव विभाग प्रमुख
Source link
फलकाअभावी सावळेश्वर, कोळेगावजवळ अपघात:बॅरिकेड्स, दिशादर्शक फलकांचा अभाव; ट्रक आणि कारचे मोठे नुकसान, चौघे जण बचावले