दिल्लीचे जंतर मंतर आंदोलनाचा आत्मा असून केंद्राने त्या ठिकाणी आंदोलनासाठी बंदी घातली असली तरी दिल्लीतच नव्हे तर देशात हजारो जंतरमंतर तयार होऊन आंदोलन सुुरु होतील असा इशारा सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी मंगळवारी ता. 13 माध्यमांशी बोलतांना दिला आ
.
हिंगोली तालुक्यातील संतुक पिंपरी येथे त्यांच्या आजी सावित्राबाई दिपके यांच्या रक्षा सावडण्याच्या कार्यक्रमानंतर अभिजीत दिपके यांनी दिल्लीकडे धाव घेतली आहे. त्यापुर्वी माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले की, जंतर मंतर हे स्थळ आंदोलनाचा आत्मा आहे. या ठिकाणी आंदोलन करतांना वेगळीच ऊर्जा मिळते.
मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी हुकूमशाही सुरु केली असून जंतर मंतर येथे आंदोलनात बंदी घातली आहे. मात्र त्या ठिकाणी आंदोलनात बंदी घातली असली तरी दिल्लीतच नव्हे तर देशभरात हजारो जंतरमंतर तयार होऊन त्या ठिकाणी लाखो तरुण आंदोलन करतील. मोदी अन शहा यांनी आंदोलनस्थळाशी काही देणेघेणे नाही उलट त्यांना हे आंदोलन नको आहे. मात्र जो पर्यंत ज्ञानेशकुमार यांचा राजिनामा होणार नाही तो पर्यंत आंदोलन थांबणार नाही अशी भुमीका दिपके यांनी यावेळी जाहिर केली.
दिल्लीत जंतरमंतरवर तिरंगा ध्वज फडकविल्यानंर आशुतोष राका, सौरव दास यांना अटक केल्याच्या प्रकरणात बोलतांना दिपके म्हणाले की आमचे विधीज्ञांचे पथक न्यायालयात दाद मागतील. आशुतोष व सौरव यांनी कोणताही गुन्हा केलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीकडे रवाना होतांना पोलिसांनी रस्त्यातच ताब्यात घेतले तर त्याच ठिकाणावरून आंदोलन सुरु केले जाईल असा इशाराही दिपके यांनी दिला आहे. आज दिल्लीकडे रवाना होत असून बुधवारी ता. 14 दिल्लीत पोहोचून आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वृत्त वाचा
रांका, दास जंतरमंतरवरून ताब्यात:सरकारची येथे निदर्शने करण्यास बंदी; CJP नेते म्हणाले- ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत येथेच निदर्शने

दिल्ली पोलिसांनी मंगळवारी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना ताब्यात घेतले. या दोघांनी CJP च्या समर्थकांसह जंतर-मंतरवर जात घोषणाबाजी केली होती. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले.
या घटनाक्रमानंतर CJP ने ताब्यात घेतलेल्या नेत्यांचा एक व्हिडिओ जारी केला. त्यात रांका म्हणाले, “ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत तोपर्यंत जंतर-मंतरवर आंदोलन सुरूच राहील. आज दहा जण आलेत. उद्या १,००० जण येतील, परवा १०,००० जण येतील.” वाचा सविस्तर
इंडिया आघाडीच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा:निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेवरही उपस्थित केले प्रश्न

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सध्या राजधानी दिल्लीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. इंडिया आघाडीने निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक पवित्रा घेत सर्वोच्च न्यायालयावर धडक मोर्चा काढला होता. याच संपूर्ण राजकीय घडामोडींवर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर ‘सीजेपी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनीही ताशेरे ओढले आहेत. “सर्वोच्च न्यायालय नरेंद्र मोदींना ही निवडणूक न लढवता पुढची निवडणूक लढवण्याचा सल्ला देऊ शकते का?” असा सवाल विचारत दिपके यांनी न्यायव्यवस्थेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वाचा सविस्तर