Headlines

पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची तयारी:विधानसभा प्रभारी जाहीर; दोन्ही मतदारसंघांत 4.50 लाख मतदारांसाठी 1,051 मतदान केंद्रे




पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार विधानसभा प्रभारी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यातून पदवीधर निवडणुकीसाठी स्मिता जाधव तर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत कौस्तुभ गावडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीसाठी भाजपकडून जय्यत तयारी सुरू असल्याचे दिसत आहे. भाजपने जाहीर केलेल्या प्रभारी पुढील प्रमाणे आहेत: 4 लाख 50 हजार मतदार; 1,051 मतदान केंद्रे पदवीधर मतदारसंघासाठी एकूण 3 लाख 88 हजार मतदार असून, त्यांच्यासाठी 741 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. तर शिक्षक मतदारसंघासाठी 62 हजार मतदार असून, त्यांच्यासाठी 310 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. अशा प्रकारे दोन्ही मतदारसंघांत मिळून सुमारे 4 लाख 50 हजार मतदार 1,051 मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पदवीधर मतदारसंघात 47 उमेदवार पदवीधर मतदारसंघासाठी एकूण 75 उमेदवारांनी 87 नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. छाननीनंतर 70 उमेदवारांचे 81 नामनिर्देशन अर्ज वैध ठरले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी, 9 ऑक्टोबर रोजी 23 उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर अंतिमतः 47 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. शिक्षक मतदारसंघात 30 उमेदवार शिक्षक मतदारसंघासाठी एकूण 49 उमेदवारांनी 67 नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. छाननीनंतर 48 उमेदवारांचे 65 नामनिर्देशन अर्ज वैध ठरले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर 30 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मतदारांना मतदानाचे आवाहन दोन्ही मतदारसंघांतील मतदारांनी आपला मतदानाचा अमूल्य हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी शीतल तेली-उघले यांनी केले आहे. मतदान करताना मतपत्रिकेवरील सूचनांचे पालन करून आपले मत वैध राहील, याची मतदारांनी काळजी घ्यावी. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *