![]()
दर नियंत्रणासाठी केंद्रीय ग्राहक मंत्रालयासाठी नाफेड, एनसीसीएफने खरेदी केलेला ९.६० लाख क्विंटल कांदा नाशिकमध्ये सडला आहे. उत्कृष्ट दर्जाच्या २३ रुपये प्रतिकिलो या भावाने ११.९० लाख क्विंटलची खरेदी दाखवली होती. त्यापैकी फक्त २.३० लाख क्विंटल या संस्था बाजारात आणू शकल्या. सडलेला ९.६० लाख क्विंटल कांदा खत बनवण्यासाठी म्हणूनही कुणी घेत नाही. परिणामी या संस्थांनी ३० सप्टेंबर, ५ ऑक्टोबर आणि १० ऑक्टोबरला अशा तीनदा निविदा काढल्या. मात्र १ रुपये भावानेही तो खरेदी करण्यासाठी कुणी पुढे आलेले नाही. खतासाठी विक्रीचा प्रयत्न एनसीसीएफचा बारा हजार मेट्रिक टन कांदा बाजारपेठेत पोहोचू शकला. सडलेला कांदा खत म्हणून विक्रीस काढला आहे. किलोला दोन ते चार रुपये भाव मिळू शकतो. -श्री हर्षा, व्यवस्थापक, नाशिक शाखा, एनसीसीएफ जिल्हाधिकाऱ्यांतर्फे चौकशी सुरू कांदा खरेदीतील या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी २९ सप्टेंबरला पणन खात्याने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीने चौकशी सुरू केली. या समितीचे सदस्य असलेले प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना २६ ऑक्टोबरपर्यंत सर्व खरेदी केंद्रे आणि वखार महामंडळाच्या गोदामांना प्रत्यक्ष भेटी देऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील नाफेडच्या गोदामात सडलेला आणि पूर्णपणे काळा पडलेला कांदा. तळाच्या साठ्याला पाणी सुटल्यामुळे त्याची असह्य दुर्गंधीही या चाळीत पसरलेली होती. या कांद्यासाठी ठेकेदार संस्थांनी उत्कृष्ट कांद्याचा २३ रुपये प्रतिकिलो भाव मोजला.
Source link
नाशिकला नाफेड, एनसीसीएफ गोदामात 9.60 लाख क्विंटल कांद्याचा चिखल:दर नियंत्रणासाठी निकृष्ट खरेदी केल्याचे उघड