Headlines

लखनऊत 15 दिवसांपासून पूर, 5 लाख जणांना फटका:हिमाचलमध्ये वादळी वाऱ्याचा इशारा, उत्तराखंडच्या 7 जिल्ह्यांत पावसाची शक्यता




उत्तर प्रदेशाची राजधाी लखनऊत गत 15 दिवसांपासून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा फटका 5 लाखांहून अधिक लोकांना बसला आहे. फैजुल्लागंजमध्ये सर्वाधिक अडचणी आहेत. येथे 50 ते 60 हजारांहून अधिक घरे अर्ध्याहून अधिक पाण्यात बुडाली आहेत. काही भागांत पाण्याची पातळी कमी झाली आहे, मात्र लोकांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. रस्त्यांवर नौका धावत आहेत. हवामान विभागाने हिमाचलच्या मैदानी भागांत पाऊस, तर लाहौल-स्पीती, किन्नौर आणि चंबाच्या उंच शिखरांवर बर्फवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यावेळी काही ठिकाणी वादळी वारे वाहण्याचा आणि आकाशातून वीज कोसळण्याचाही इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील 7 जिल्ह्यांत आज पावसाची शक्यता आहे. यामध्ये देहरादून, उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, नैनीताल आणि पिथौरागढ यांचा समावेश आहे. 3,500 मीटर किंवा त्याहून अधिक उंचीच्या भागांत बर्फवृष्टी होऊ शकते. राज्यातील उर्वरित जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये पुढील काही दिवस हवामान सामान्य राहण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतांश भागांत आकाश निरभ्र राहील. १४ ते १६ ऑक्टोबरपर्यंत कमाल तापमान ३३ अंशांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे दिवसा उन्हामुळे उष्णता जाणवेल. उपग्रहाच्या नकाशात पाहा मान्सूनच्या ढगांची स्थिती देशभरातील हवामानाची छायाचित्रे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *