![]()
सप्तशृंगगड येथे नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळेला सुमारे २५ ते ३० हजार भाविकांनी सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर परिसरात ‘सप्तशृंगी माता की जय, अंबे माता की जय’ असा जयघोष करत भाविकांनी परिसर दणाणून सोडला. तिसऱ्या माळेची पंचामृत महापूजा धर्मादाय उपआयुक्त प्रणिता श्रीनिवार यांच्या हस्ते झाली. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी देवीचे दर्शन घेतले. तसेच नाशिक पश्चिमच्या आमदार सिमा हिरे यांनी कुटुंबीयांसमवेत देवीचे दर्शन घेतले.यंदा आई सप्तशृंगीचे नवीन तेजोमय स्वरूप पाहण्यासाठी भाविकांमध्ये उत्सुकता दिसून आली. मंदिरात देवीचे मनमोहक स्वरूप पाहिल्यानंतर भाविकांनी आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी श्री भगवतीला साकडे घातले.यावेळी नाशिक येथील धर्मादाय कार्यालयाचे अधीक्षक विशाल जाधव, श्री सप्तश्रृंग निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, सुरक्षा अधिकारी यशवंत देशमुख आदींसह ट्रस्टचे कर्मचारी उपस्थित होते.
Source link
सप्तशृंगगडावर तिसऱ्या माळेची पंचामृत महापूजा:देवीचे तेजोमय रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी