Headlines

आंध्रात उभारले जात आहे गुगल डेटा सेंटर:आरोप- 160 एकर जंगल साफ, पाण्याचा तुटवडा भासेल; गुगलचा दावा- एअर कूलिंग तंत्र वापरू




आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे गुगलचे डेटा सेंटर उभारले जात आहे. या प्रकल्पांतर्गत तीन कॅम्पस उभारले जाणार आहेत. राज्य सरकारने यासाठी तीन गावांमधील 586 एकर जमीन दिली आहे. अदाविवरम-मुदासरलोवा गावात काम सुरू झाले आहे. 160 एकर क्षेत्रातील जंगल तोडून जमीन सपाट करण्यासाठी डोंगर कापल्याचा आरोप आहे. वन्यजीव अभयारण्य आणि जलाशयाजवळ हा प्रकल्प असल्याने पर्यावरणवादीही या प्रकल्पाला विरोध करत आहेत. गावकऱ्यांचे म्हणणे आहे, ‘ही जमीन त्यांच्या उपजीविकेचा आधार होती.’ तरलुवाडाच्या माजी सरपंच पायला कोंडम्मा यांनी सांगितले, ‘सर्वेक्षणाच्या वेळी अधिकाऱ्यांनी जमीन आमच्याच मालकीची राहील, असा विश्वास दिला होता.’ शेतकरी अप्पलाराजू यांनी आरोप केला की, अनेक वर्षांपूर्वी वाटप केलेली जमीन आता घेतली जात आहे. 15 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ₹1.3 लाख कोटींचे एआय हब उभारले जात आहे. यात मोठी डेटा सेंटर आणि आंतरराष्ट्रीय समुद्राखाली टाकल्या जाणाऱ्या इंटरनेट केबल्सचे नेटवर्क समाविष्ट आहे. बांधकाम एप्रिल 2026 मध्ये सुरू झाले असून कंपनीच्या म्हणण्यानुसार, ते 2028 मध्ये सुरू होऊ शकते. विझाग प्रकल्पातील तीन प्रमुख मुद्दे गुगल म्हणाले- पाणी वाचवण्यासाठी एअर कूलिंग तंत्रज्ञानाचा वापर ‘बेंगळुरू क्लायमेट डेटा वीक’मध्ये, गुगलच्या डेटा सेंटर कम्युनिटी आणि वर्कफोर्स डेव्हलपमेंटमध्ये काम करणाऱ्या आरती आहुजा यांनी सांगितले की, गुगल जेव्हा कुठेही आपले काम सुरू करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा त्या परिसरातील हवामानाची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करते. पाण्याची उपलब्धता आणि पाण्याच्या स्रोतांचे सखोल मूल्यांकन केले जाते. म्हणूनच आम्ही विचारपूर्वक एअर कूलिंग तंत्रज्ञान स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये लिक्विड कूलिंगच्या तुलनेत कमी पाण्याची गरज भासेल. डेटा सेंटर उभारलेल्या 2 देशांतील परिस्थिती



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *