![]()
नागपूर पोलिसांनी ४० लाख रुपयांच्या दागिन्यांच्या जबरी चोरीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशमधून चार सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली. पोलिसांनी चोरीसाठी वापरलेली फॉर्च्यूनर कारही जप्त केली आहे. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत हिंगणा रोडवरील ‘ढोमणे ज्वेलर्स’मध्ये ही घटना घडली होती. दुकानात एकट्या असलेल्या कामगाराला बंदुकीचा धाक दाखवून ३५० ग्रॅम सोने-चांदीचे दागिने चोरण्यात आले होते. पोलिसांनी ३०० ते ४०० सीसीटीव्ही फुटेज आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तपास केला. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेची पथके उत्तर प्रदेश आणि हरियाणात पोहोचली. सात दिवसांच्या शोधमोहिमेनंतर आरोपींना पकडण्यात आले. बरेलीतून मुख्य आरोपी अभिषेकसिंग ठाकुर याला अटक झाली. त्याच्या चौकशीतून नोएडा येथून जयराम उर्फ जोगींदर अशोकसिंग ठाकुर, शुभांकीत निलेशकुमार चतुर्वेदी आणि मेरठ येथून राजन सामी शर्मा यांनाही पकडण्यात आले. फॉर्च्यूनर कार (एम.एच ४९ बी. ९१९२) जप्त करण्यात आली आहे.
Source link
नागपूर पोलिसांकडून 40 लाखांच्या दागिन्यांच्या जबरी चोरीचा पर्दाफाश:उत्तर प्रदेशातून 4 सराईत गुन्हेगार फॉर्च्यूनर कारसह पकडले