![]()
उल्हासनगर रेल्वे स्टेशनबाहेरील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर दुपारी अज्ञात हल्लेखोरांनी स्थानिक यूट्यूबर हरीश गजवानी यांच्यावर पाठीमागून येऊन बेछूट गोळीबार केला. हल्लेखोरांनी गजवानी यांच्या डोक्यात अगदी जवळून २ गोळ्या झाडल्याने ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. दिवसाढवळ्या घडलेल्या या थरारक हत्याकांडाने उल्हासनगर आणि ठाणे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला असल्याचे सांगितले आहे. हरीश गजवानी यांच्या हत्येमागचे कारण मात्र अजूनही अस्पष्ट हरीश गजवानी यांच्या हत्येमागे वैयक्तिक वाद, जुने वैमनस्य, आर्थिक व्यवहार किंवा अन्य कोणते कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या सर्व शक्यतांची पडताळणी तपासातून केली जाणार आहे. पोलिसांच्या तपासानंतरच हत्येमागील नेमके कारण समोर येऊ शकेल.
Source link
उल्हासनगरात रस्त्यात थरार: यूट्यूबर गजवानींची दोन गोळ्या झाडून हत्या:रेल्वे स्टेशन परिसरातील घटना; हत्येमागे वैयक्तिक वाद असण्याची शक्यता