Headlines

‘फुकट खाणारे दिसतो का?’ म्हणत पाणीपुरी विक्रेत्याचा गळा चिरला:छत्रपती संभाजीनगरात सेंट्रल नाका परिसरात 140 रुपयांसाठी चौघांकडून हल्ला




पाणीपुरी खाल्ल्याचे १४० रुपये मागितल्याच्या रागातून ४ तरुणांनी विक्रेत्याच्या गळ्यावर व कानावर चाकूने वार केले. शेजारील व्यावसायिकाने वेळीच धाव घेतल्याने या विक्रेत्याचे प्राण वाचले असून, याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात ४ अनोळखी तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. जितेंद्र जयराम कुशवाह (२७, रा. अल्तमश कॉलनी) हे सेंट्रल नाका स्मशानभूमीच्या बाजूला पाणीपुरीची हातगाडी लावतात. सोमवारी (१२ ऑक्टोबर) रात्री ९ ते ९.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या गाडीवर चार अनोळखी तरुण आले. त्यांनी १४० रुपयांची पाणीपुरी खाल्ली आणि ऑनलाइन पेमेंट केले. मात्र, जितेंद्र यांच्या मोबाइलवर पैसे जमा न झाल्याने ते तरुणांना, ‘मला पैसे आले नाहीत, माझे पैसे द्या,’ असे म्हणाले. पैसे मागितल्याचा राग आल्याने या तरुणांनी,‘आम्ही काय फुकट खाणारे दिसतो काय?’ असे म्हणत जितेंद्र यांच्याशी हुज्जत घातली. त्याचबरोबर चौघांनी त्यांना शिवीगाळ, मारहाण सुरू केली. त्यातील एका तरुणाने खिशातून चाकू काढला आणि त्यांच्या डाव्या कानावर व उजव्या गळ्यावर वार केले. गळ्यावर वार झाल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव सुरू झाला आणि जितेंद्र जागीच कोसळले. हे पाहताच चारही हल्लेखोर तेथून पसार झाले. जुन्या शहरात ‘बटण’ नशेखोरांचा त्रास जुन्या शहरात आणि सेंट्रल नाका परिसरात रात्रीच्या वेळी ‘बटण गोळ्या’ खाऊन नशा करणाऱ्या तरुणांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या नशेखोरांच्या दहशतीमुळे नागरिक व व्यावसायिक प्रचंड त्रस्त आहेत. नशेत असलेले हे तरुण रस्त्यावरील विक्रेत्यांना कायम त्रास देतात. पोलिसांत अनेक तक्रारी देऊनही ठोस कारवाई झालेली नाही. याच नशेखोरीतून हल्ल्यांच्या घटना घडत आहेत शेजाऱ्याची माणुसकी जितेंद्र यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून, त्यांच्या बाजूलाच कपड्याची गाडी लावणारे व्यावसायिक शेख रियाजोद्दीन यांनी तातडीने धाव घेतली. त्यांनी जितेंद्र यांना उचलून एमजीएम रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या सतर्कतेमुळे जितेंद्र यांचे प्राण बचावले. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींच्या शोधासाठी एक विशेष पथक तैनात केल्याची माहिती निरीक्षक गणेश ताठे यांनी दिली. हल्ल्यामुळे कुटुंब धास्तावले जितेंद्र कुशवाह यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर त्यांचे कुटुंब धास्तावले आहे. कुटुंबीयांशी संपर्क साधला असता, या शहरात राहायचे नाही त्यांनी आम्ही बिहारमध्ये गावी परत जाऊन शेती करणार असल्याचे सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *