Headlines

‘रोहयो’पेक्षा सोयाबीन सोंगणी भारी; कामगारांना मिळतेय तिप्पट मजुरी:540 मजूर घटले; दोन तालुक्यात योजनेची कामे झाली ठप्प‎



गत आठवड्याभरापासून ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला सोयाबीन सोंगणीच्या माध्यमातून रोजगारासोबतच तीनपट दाम मिळत असल्याने मजुरांनी ‘विकसित भारत – रोजगार आणि आजीविका हमी अभियान (व्हीबी-जी रामजी) योजनेच्या कामाकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहा

.

जिल्ह्यात सध्या सोयाबीनचे पीक काढणीला आले आहे. त्यामुळे मजूरवर्ग सोयाबीन सोंगणीची कामे करण्यावर अधिक भर देत आहे. व्हीबी-जी रामजी योजनेच्या कामावर तेवढी मजुरी मिळत नाही. त्यापेक्षा तिप्पट मजुरी सोंगणीच्या कामातून मिळत असल्याने बहुतांश मजूरवर्ग या कामाकडे वळला आहे. त्यामुळे व्हीबी-जी रामजी योजनेवर कामे करणाऱ्या मजुरांच्या संख्येत प्रचंड मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अशी परिस्थिती साधारण पुढील दोन आठवडे राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आजही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन उभे आहे. काही गावांतील शेतकऱ्यांना सोयाबीन सोंगणीसाठी मजूर मिळत नसल्याचे देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे व्हीबी-जी रामजी योजनेच्या कामावरील मजुरांची संख्या अजून काही दिवस तरी कमीच असणार हे स्पष्ट झाले आहे.

दोन दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील ५४० मजुरांनी व्हीबीजीरामजीच्या कामाकडे पाठ फिरवली आहे. ११ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील ११ तालुक्यांत या योजनेवर काम करणाऱ्या मजुरांची एकूण संख्या २,२६३ होती. ती १३ ऑक्टोबर रोजी कमी होऊन १,०८० वर आली आहे. मोताळा व मेहकर तालुक्यात या योजनेवरील काम करणाऱ्या मजुरांची संख्या शून्य आहे. दुष्काळी जिल्ह्यातील शासकीय योजनांची ही विदारक परिस्थिती आहे.

जिल्ह्यात या योजनेअंतर्गत प्रामुख्याने घरकुल, सिंचन विहिरी, रस्ते, पेवर ब्लॉक, शोषखड्डे, शेततळे, फळबाग, तुती लागवड, वृक्ष लागवड, पांदण रस्ते, केळी लागवड ही कामे सुरू आहेत.

२२१ ग्रामपंचायतींमध्ये कामे सुरू; मात्र कामगारात घट जिल्ह्यात एकूण ८८९ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी केवळ २२१ ग्रामपंचायतींमध्ये या योजनेची कामे सुरू आहेत. बुलडाणा तालुक्यातील ६६ पैकी २८, चिखली ९९ पैकी १७, देऊळगाव राजा ४८ पैकी ११, जळगाव जामोद ४७ पैकी ५, खामगाव ९७ पैकी ५८, लोणार ७० पैकी २१, मलकापूर ४९ पैकी २२, मोताळा निरंक, मेहकर निरंक, शेगाव ४६ पैकी १६, तर सिंदखेड राजा ८९ पैकी १४, संग्रामपूर ५० पैकी २४ ग्रामपंचायतींमध्ये कामे सुरू आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *