Headlines

शहरातील अतिक्रमण मनपाकडून जमीनदोस्त:मोठी कारवाई; वाहतूक कोंडीतून दिलासा‎




शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत अतिक्रमणांविरुद्ध महानगरपालिकेने आक्रमक मोहीम उघडली आहे. मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या आदेशान्वये व उपायुक्त गणेश शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण झोनमधील प्रतिबंधित मार्गावर धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये हुतात्मा स्मारक चौक ते संत तुकाराम चौक या दरम्यानच्या रस्त्यावरील हातगाड्या, अनधिकृत शेड, बॅनर्स आणि फलके हटवून रस्ता मोकळा करण्यात आला. शहरातील रहदारीच्या हुतात्मा स्मारक चौक ते संत तुकाराम चौक या मार्गावर अनेक विक्रेत्यांनी हातगाड्या लावून तसेच दुकानदारांनी रस्त्यावर पत्र्याचे शेड बुधवारी मनपाच्या पथकाने सर्व अनधिकृत साहित्य, शेड, विनापरवाना लावलेले फलक व बॅनर जप्त करून जमीनदोस्त केले. ही कारवाई सहाय्यक अतिक्रमण अधिकारी प्रवीण मिश्रा व चंद्रशेखर इंगळे यांच्यासह पथकातील पथकप्रमुख मनीष भोबळे, स्वप्नील पवार, कुणाल शाहू, योगेश देवकते, आदित्य माहूलकर, निलेश तायडे, सय्यद अजहर, तुषार गांधे आणि यश घोडे यांनी केली. हॉकर्स झोन कागदावरच शहरातील मुख्य रस्ते मोकळे करण्यासाठी महापालिकेने ‘हॉकर्स झोन’ आणि ‘नो-हॉकर्स झोन’ निश्चित केले होते. मात्र, नियोजित हॉकर्स झोनमध्ये पाणी, वीज आणि सुरक्षेसारख्या मूलभूत सुविधा नसल्याने विक्रेते पुन्हा मुख्य रस्त्यांवरच दुकाने थाटत आहेत. कारवाई करताना हातावर पोट असणाऱ्या छोट्या विक्रेत्यांचा माल जप्त होतो; त्यामुळे केवळ कारवाई न करता त्यांना पर्यायी अधिकृत जागा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *