Headlines

पुण्यात दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांना लुटले:खडक आणि विमानतळ पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल




पुणे शहरात वेगवेगळ्या घटनेत दोघांना लुटण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध खडक आणि विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. विमाननगर भागात दुचाकीस्वाराला धमकावून त्याच्याकडील रोकड आणि लॅपटॉप असा ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेण्यात आल्याची घटना घडली. याबाबत एकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण खडकी बाजार परिसरात राहायला आहे. दुचाकीस्वार तरुण विमाननगर भागातून निघाला होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या एकाने तरुणाला अडवून वाद घालण्यास सुरुवात केली. विरुद्ध दिशेने का आला ? अशी विचारणा केली. त्यानंतर दुचाकीस्वार आरोपीने साथीदारांना बोलावून घेतले. तरुणाला धमकावून त्याच्याकडील नऊ हजार ८०० रुपये आणि लॅपटॉप असा ४५ हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आला. दुचाकीवरुन आरोपी पसा झाले. घाबरलेल्या तरुणाने नुकतीच विमानतळ पोलिसांकडे तक्रार दिली असून, पोलीस उपनिरीक्षक पालवे तपास करत आहेत. मध्य भागात एकाला धमकावून त्याच्या खिशातील १२०० रुपये काढून घेण्यात आले. या प्रकरणी राहुल उर्फ नळ्या राजेंद्र लांडगे (वय ३३, रा. इनामके मळा, लोहियानगर) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण गुरुवार पेठेतील मीठगंज पोलीस चौकीजवळ राहायला आहे. १४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास तरुणाला धमकावून आरोपीने त्याच्या खिशातील रोकड लुटली. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे तपास करत आहेत. हेही वाचा.. पुण्यात एमआयएलच्या कार्यकारी संचालकाकडून 2.23 कोटी जप्त:500 कोटी करारात लाच, सीबीआयकडून तिघांना अटक
केंद्र सरकारचे स्वामित्व असलेली सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उत्पादन कंपनी म्युनिशन्स इंडिया लिमिटेडचे (एमआयएल) कार्यकारी संचालक अनिल कुमार यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली. ५०० कोटींच्या दारुगोळा करारात लाचखोरी आणि संरक्षण क्षेत्रातील संवेदनशील माहिती उघड केल्याच्या त्यांच्यावर आरोप आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *