Headlines

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला आमचा पाठिंबा नाही:महायुतीच्या भूमिकेला छेद देणाऱ्यांच्या विरोधात ठामपणे उभा राहणार- संजय शिरसाट




मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला आमचा पाठिंबा नाही, हे पूर्णपणे स्पष्ट आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसारच आम्ही हा निर्णय जाहीर केला आहे. राष्ट्रवादीत काही असे लोक आहेत, ज्यांना निवडणूक लढवलीच पाहिजे असा अट्टाहास असतो. त्यांच्या याच आग्रहामुळे अनेकदा महायुतीवर आणि निकालांवर परिणाम होतो, असे शिवसेना प्रवक्ते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. संजय शिरसाट म्हणाले की, अमरावती विधान परिषद निवडणुकीची तयारी कशी आहे, हे पाहण्यासाठी शिवसेना नेते उदय सामंत यांना तिथे पाठवण्यात आले आहे. तिथे जाऊन त्यांनी सद्यस्थितीची पाहणी करावी आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची समजूत घालावी, असे ठरले आहे.जर त्यांनी आपल्या उमेदवाराला पाठिंबा दिला नाही, तर मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा न देण्याचा जो निर्णय आम्ही घेतला आहे, तेच धोरण कायम राहील. उदय सामंत पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका अधिक स्पष्ट करतील. मात्र, सध्यातरी मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी आमचा राष्ट्रवादीला पाठिंबा नाही. ..तर आम्ही त्याला विरोध करणार संजय शिरसाट म्हणाले की, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे सर्वजण एक उत्तम भूमिका घेऊन पुढे जात आहेत. परंतु, अशा प्रकारच्या निर्णयामुळे त्या भूमिकेला धक्का बसतो. असे करू नये, हीच आमची महायुती म्हणून स्पष्ट भूमिका आहे. महायुतीच्या या भूमिकेला जर कोणी छेद देण्याचा प्रयत्न करत असेल, तर आम्ही त्यांच्याविरोधात ठामपणे उभे राहणार. शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तात्पुरती संजय शिरसाट म्हणाले की, राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी 5 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. या रकमेत दिवाळी साजरी होऊ शकत नाही, हे सर्वसामान्य माणसालाही समजू शकते. मात्र, काही जण केवळ टीका करायची म्हणून टीका करत आहेत. सत्ताधारी म्हणून आमची सर्वांचीच अशी भूमिका आहे की, ही मदत नक्कीच वाढवली पाहिजे; परंतु त्यासाठी सरकारला थोडा वेळ देणे आवश्यक आहे. ही केवळ एक तात्पुरती मदत असून, ती कायमस्वरूपी मदत समजली जाऊ नये. सत्ताधारी पक्षाच्या अनेक मंत्र्यांची, आमदारांची, खासदारांची आणि पदाधिकाऱ्यांची सुद्धा हीच भूमिका आहे की, मदत वाढवून मिळाली पाहिजे. हे सरकार खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि त्यांना हवी तेवढी मदत देण्याची आमची तयारी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर योग्य तो निर्णय नक्कीच घेतील. सध्या पंचनामे सुरू असून, जेव्हा दुष्काळ जाहीर झाला तेव्हा 265 तालुके होते, ते आता वाढून 305 कसे झाले, याचाही सरकार अभ्यास करत आहे. कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये आणि त्याला त्रास होऊ नये, हीच सरकारची प्रामाणिक भूमिका आहे. राऊतांना कोणाला मोठे होऊ द्यायचे नाही संजय शिरसाट म्हणाले की, आनंद दुबे हे उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते होते आणि त्यांनी तिथे चांगले काम केले होते. परंतु, उबाठा गटात संजय राऊत यांच्याशिवाय दुसरा कोणताही प्रवक्ता पुढे येऊ नये, अशी परिस्थिती आहे. ते स्वतःशिवाय इतर कोणालाही मोठे होऊ देत नाहीत. तसेच, पक्षात एक मॅडम आहेत, ज्या बोलतात पण त्यांच्या बोलण्याला किती गांभीर्याने घेतले जाते हे सांगता येत नाही. पक्षात दुसरा कोणताही चेहरा किंवा व्यक्ती पुढे जाऊ नये, या अंतर्गत स्पर्धेला कंटाळूनच आनंद दुबे यांनी उबाठा गटाला रामराम करत आमच्या पक्षात प्रवेश केला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. हे ही वृत्त वाचा

सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा:आम्हाला न्यायालयावर पूर्ण विश्वास, न्यायालयाला धमक्या देणाऱ्यांवर कारवाई व्हावी- संजय राऊत
तिरंगा फडकवणे हा गुन्हा आहे असे 1947 नंतर रा.स्व.संघाने मानले होते. त्यांनी त्यांच्या मुख्यालयावर जवळपास 40 ते 45 वर्षे तिरंगा फडकवला नव्हता. त्यांच्या दृष्टीने तिरंगा फडकवणे हा गुन्हा होता. आमच्या दृष्टीने तो सन्मान आहे, सीजेपीने तिरंगा फडकवला असेल तर अमित शहा आणि पोलिसांना राग येण्याचे काय कारण आहे? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा. आम्ही कोर्टाकडून अपेक्षा ठेवणार नाही तर कोणाकडून अपेक्षा ठेवणार. न्याय मिळावा म्हणूनच आम्ही सुप्रीम कोर्टाकडे जात आहोत. आम्हाला न्याय मिळेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे, असे राऊतांनी म्हटले. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *