![]()
माफीवीर राहुल गांधी यांच्यापाठोपाठ आता संजय राऊत हेदेखील माफीवीर झाले आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाची नाक घासून माफी मागितली आहे. परंतु, केवळ सर्वोच्च न्यायालयाची माफी मागून भागणार नाही, तर त्यांना देशातील 140 कोटी जनतेचीही माफी मागावी लागेल. कारण रोज सकाळी उठून खोटे बोलणे आणि जनतेची दिशाभूल करणे हाच त्यांचा धंदा झाला आहे. माफी मागण्याची राहुल गांधींची परंपरा आता संजय राऊत पुढे चालवत आहेत, असा टोला भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी लगावला आहे. नवनाथ बन पुढे म्हणाले की, जनाब संजय राऊत आज सर्वोच्च न्यायालयात न्यायाची भाषा करत आहेत. त्यांनी पालघर साधू हत्याकांड, दिशा सालियान प्रकरण आणि पत्राचाळ घोटाळा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाऊन न्याय मागितला पाहिजे; तिथे नक्कीच न्याय दिला जाईल. दररोज नवनवे खोटे दावे करून केवळ जनतेची दिशाभूल करणे हाच त्यांचा एकमेव उद्योग उरला आहे. जनतेची दिशाभूल करू नये नवनाथ बन पुढे म्हणाले की, 13 कोटी मतदार वगळण्यात आल्याचा दावा करत राहुल गांधी आणि संजय राऊत देशाची दिशाभूल करत आहेत. 13 कोटींचा हा आकडा पूर्णपणे धूळफेक करणारा आहे. यातील जवळपास 10 कोटी हे दुबार, मृत आणि स्थलांतरित झालेले मतदार आहेत. उरलेल्या 3 कोटी मतदारांबाबत काही संभ्रम आहे; मात्र ‘एसआयआर’ मोहिमेअंतर्गत जे पात्र मतदार असतील, ते ‘फॉर्म 6’ भरून केव्हाही मतदार यादीत आपले नाव नोंदवू शकतात. परंतु, विरोधकांना बांगलादेशी घुसखोर, रोहिंग्या आणि दुबार-तिबार मतदारांची नावे यादीत हवी आहेत, म्हणूनच त्यांचा ‘एसआयआर’ मोहिमेला विरोध आहे. ही प्रक्रिया सुरू असताना यांना बीएलए नेमणे शक्य झाले नाही, कारण यांच्याकडे तेवढे कार्यकर्तेच उरलेले नाहीत. निवडून आलेल्या 9 खासदारांपैकी 6 खासदार सोडून गेले, ते सांभाळता आले नाहीत. आमदार आणि कार्यकर्ते सांभाळता येत नसताना हे निवडणूक आयोगावर टीका करत आहेत. स्वतःच्या पक्षाची दयनीय अवस्था पाहून उबाठा गटाने भाष्य केले पाहिजे. देशात बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न नवनाथ बन पुढे म्हणाले की, सीजेपीला या देशात बांगलादेशसारखी परिस्थिती आणायची आहे का? किंवा नेपाळसारखी जाळपोळ घडवायची आहे का? काल प्रशांत भूषण यांनी आम्हाला सत्ताबदल करायचा आहे असे स्पष्टपणे सांगितले. त्यावरूनच तुमचा मनसुबा उघड झाला आहे. तुम्हाला देश, संविधान, सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि जनतेने निवडून दिलेले सरकार नको आहे. म्हणूनच अराजकता पसरवून बांगलादेशात निर्माण झाली तशी परिस्थिती भारतात निर्माण करण्याचा तुमचा कुटील प्रयत्न सुरू आहे. हे ही वृत्त वाचा
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला आमचा पाठिंबा नाही:महायुतीच्या भूमिकेला छेद देणाऱ्यांच्या विरोधात ठामपणे उभा राहणार- संजय शिरसाट मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला आमचा पाठिंबा नाही, हे पूर्णपणे स्पष्ट आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसारच आम्ही हा निर्णय जाहीर केला आहे. राष्ट्रवादीत काही असे लोक आहेत, ज्यांना निवडणूक लढवलीच पाहिजे असा अट्टाहास असतो. त्यांच्या याच आग्रहामुळे अनेकदा महायुतीवर आणि निकालांवर परिणाम होतो, असे शिवसेना प्रवक्ते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर
Source link