![]()
करमाळा तालुक्यातील झरे गावाला दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळावे आणि गावातील तलाव भरून द्यावा, या मागणीसाठी शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांनी महिलांसह अहिल्यानगर- टेंभुर्णी महामार्गावरील खडकेवाडी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी झरे येथील शेतकरी दादासाहेब घाडगे पाटील यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना रोखले. यंदा पाऊस कमी झाल्याने झरे गावात पाणीटंचाई गंभीर बनली आहे. ग्रामस्थांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी गावासाठी सोडून तलाव भरावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. याबाबत तहसीलदारांनीपत्र देऊन कार्यवाही करण्यास सांगितले होते. शुक्रवारी झालेल्या आंदोलनात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. दि. १३ ऑक्टोबर रोजी झरे गावासाठी पाणी सोडण्यात आले. मात्र काही वेळातच पाणीपुरवठा बंद केल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. पाणी बंद करण्यामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पाणी बंद करण्याचे कारण स्पष्ट करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. ^दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी आमच्या झरे गावाला रोटेशनप्रमाणे मिळत नाही. केवळ दोन दिवस पाणी सोडले असते, तरी गावातील पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटला असता. एवढा भयानक दुष्काळ असतानाही आम्हाला पाणी मिळत नाही. जनावरांना पाणी नसल्याने ती दगावण्याची भीती आहे.सोडावे. दादासाहेब पाटील, शेतकरी, झरे
Source link
पाण्यासाठी झरेकर रस्त्यावर; पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न:सोडलेले पाणी बंदकेल्याने आंदोलन पेटले