Headlines

नवरात्रोत्सव:लाखनवाडा निंबी येथे दर्शनासाठी भक्तांची गर्दी




श्रीक्षेत्र लाखनवाडा निंबी (मालोकार) येथील श्री जगदंबा माता मंदिरात भक्तिमय वातावरणात नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला असून दर्शनासाठी भक्तांची गर्दी होत आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर तुळजापूर निवासिनी श्री तुळजाभवानी माता व माहूर निवासिनी श्री रेणुका माता या दोन्ही देवींचा अभिषेक करून विधिवत घटस्थापना करण्यात आली यावेळी पंचक्रोशीतील भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी उपस्थिती लावली. श्रीक्षेत्र लाखनवाडा निंबी मालोकार येथील मंदिरात तुळजाभवानी माता रेणुका माता या दोन्ही देवी एकाच व्यासपीठावर विराजमान असून हे स्थान भाविकांसाठी श्रद्धा व भक्तीचे महत्त्वपूर्ण केंद्र आहे. घटस्थापनेच्या निमित्ताने पंचक्रोशीतील सुनील चतरकर यांनी सहकुटुंब उपस्थित राहून देवीला मानाच्या साड्या अर्पण केल्या. तसेच देवीचा अभिषेक व विधिवत घटस्थापना करून धार्मिक परंपरेनुसार पूजाविधी पार पाडला. घटस्थापनेपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या नवरात्र महोत्सवात विविध धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायणाच्या व्यासपीठाची धुरा हभप श्री अंबादास महाराज मालोकार यांच्याकडे तर गाथा पारायणाचे व्यासपीठ ह भ प अमृतानंद जी महाराज भूषवित आहेत. मंदिर परिसरात दररोज काकडा, हरिपाठ, महाआरती कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण नवरात्रोत्सव काळात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळणार आहे. या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवातील धार्मिक कार्यक्रमासह सोहळ्यात सहभागी होऊन देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टचे विश्वस्त अविनाश मते यांनी केले आहे. कोजागिरी पौर्णिमेला महाप्रसादाचे आयोजन नवरात्रोत्सवाची सांगता कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रविवार २५ ऑक्टोबर रोजी रोजी होणार आहे. सकाळी भानदास महाराज टाकळीकर यांचे काल्याचे कीर्तन असून त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात होणार आहे व संध्याकाळी ठीक सहा वाजता पोट प्रदक्षिणा निघणार असून श्री जगदंबा माता ट्रस्ट तसेच लाखनवाडा,निंबी मालोकार,(बा.) हिंगना येथील समस्त गावकऱ्यांच्या वतीने हा धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *