Headlines

अकोला:शहरात रविवार, सोमवार ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता




शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शुक्रवारपासून हिवाळ्याची हलकी चाहूल लागली असून कमाल तापमानाचा पारा ३६.६ अंशांपर्यंत खाली आला आहे. शनिवारी दिवसभरात तापमान ३७ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता असली, तरी रविवार व सोमवारी (दि. १९) तापमानात पुन्हा घट होऊन ते ३६ अंशांपर्यंत घसरेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याच्या नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे. या काळात काही भागात ढगांच्या गडगडाटासह विजा चमकण्याची शक्यता आहे. सोमवारी १९ ऑक्टोबर रोजी दिवसभर ढगाळ हवामान राहील. प्रा. डॉ. सुरेश चोपने, हवामानतज्ञ. चक्रीवादळ, हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम उत्तर पंजाब व परिसरात उंचावरील चक्रीवादळाशी संबंधित पश्चिमी विक्षोभ व आंध्रमध्ये उंचावर चक्रीवादळ सक्रिय आहे. तामिळनाडूच्या किनाऱ्यापासून ओडिशाच्या किनाऱ्याजवळील उत्तर- पश्चिम बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे रविवारी आकाश अंशतः ढगाळ राहून विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *