“नैसर्गिक आपत्ती आणि दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला असला, तरी महायुती सरकार अन्नदात्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही, हा आमचा ठाम निर्धार आहे. दुष्काळी मदतीची अंतिम प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होण्यास वे
.
पुणे दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दुष्काळी उपाययोजना, केंद्र सरकारकडून मिळणारे साहाय्य आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी न्यायव्यवस्थेविरोधात छेडलेल्या आंदोलनावर रोखठोक भाष्य केले.
शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही
राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीवर बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, “मंत्रिमंडळाने दुष्काळ जाहीर केल्यानंतर नियमानुसार मदत वितरणास वेळ लागतो. मात्र, शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये यासाठी आम्ही 5,000 रुपयांचा तातडीचा अग्रिम देण्याचा निर्णय घेतला. ही रक्कम दिवाळीपूर्वीच थेट बँक खात्यात जमा होणार असून, यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल.”
पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे आश्वासन
“शेतकऱ्यांच्या या संकटात राज्य सरकार तर सर्वतोपरी मदत करतच आहे, पण त्यासोबतच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना मोठ्या प्रमाणावर केंद्राकडून साहाय्य करण्याचे आश्वस्त केले आहे. मी स्वतः, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण मंत्रिमंडळ शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी कटिबद्ध आहोत.”

राहुल गांधींना जनतेची दिशाभूल करण्याचेच काम!
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आंदोलनावर आणि निवडणूक आयोगावरील आरोपांवर विचारले असता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडकून टीका केली. “देशाच्या इतिहासात विरोधी पक्षाने सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढण्याचा आणि न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. हा प्रकार अत्यंत लज्जास्पद आणि निषेधार्ह आहे. विरोधी पक्षनेतेपदावर बसलेल्या व्यक्तीला संविधानाचा विसर पडला आहे का?”
संविधानाच्या नावाखाली फसवणूक
“हातात संविधानाचे पुस्तक घ्यायचे आणि प्रत्यक्षात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानिक संस्थांवर आणि न्यायव्यवस्थेवरच प्रहार करायचा, ही विरोधकांची दुटप्पी वृत्ती आहे. संविधानाने दिलेल्या स्वायत्त यंत्रणांचा गळा घोटण्याचे काम हे लोक करत आहेत.”
फेक नॅरेटिव्हचा पर्दाफाश
“विरोधकांकडे आज कोणतेही ठोस काम उरलेले नाही. केवळ समाजात अशांतता निर्माण करणे, खोटे नॅरेटिव्ह पसरवणे आणि जनतेची दिशाभूल करणे एवढाच एककलमी कार्यक्रम ते चालवत आहेत. मात्र, देशातील 140 कोटी जनता अत्यंत सुजाण आणि समंजस आहे; ती या अपप्रचाराला बळी पडणार नाही.”
देशाची भरभराट पाहून विरोधकांच्या पोटात दुखतेय!
देशाच्या विकासावर बोलताना शिंदे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश आज जागतिक स्तरावर वेगाने प्रगती करत आहे. देश आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असून भारताची प्रतिष्ठा जगात वाढत आहे.”
देशाला बदनाम करण्याचे मनसुबे उधळू
“देशाचा होत असलेला हा विकास आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील यश पाहूनच विरोधकांच्या पोटात दुखत आहे, त्यांना जळफळाट होत आहे. त्यातूनच ते देशाला बदनाम करण्याचा कुटिल डाव रचत आहेत. मात्र, देशाला बदनाम करण्याचे विरोधकांचे हे सर्व प्रयत्न भारतीय जनता हाणून पाडेल,” असा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटी केला.
———————————————————————
हेही वाचा…
नमो सन्मानचे 4,000 दिले नाहीत, दुष्काळात 5,000ची भीक कसली देता?:बारामतीतून तब्बल 7 लाख मतदार गायब कसे झाले, माझीच चौकशी करा -सुप्रिया सुळे

“राज्यातील शेतकरी आज अत्यंत भीषण दुष्काळात होरपळत असताना राज्य सरकारने जाहीर केलेली 5,000 रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे. केंद्राच्या योजनेप्रमाणे राज्य सरकारने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ अंतर्गत वर्षाला 6,000 रुपये (2,000 रुपयांचे तीन हप्ते) देण्याचा निर्णय घेतला होता. या योजनेचा शेवटचा हप्ता 13 जानेवारी 2026 रोजी खात्यात जमा झाला. त्यानंतर चालू आर्थिक वर्षात मिळायला हवे असलेले आधीचे 4,000 रुपये सरकारने अद्याप दिलेले नाहीत. आधीचे हक्काचे 4,000 रुपये बुडवायचे आणि दुष्काळात वरून 5,000 रुपये देऊन उपकार दाखवायचे, हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे. तातडीने आधीचे 4,000 आणि हे 5,000 असे किमान 9,000 रुपये खात्यात जमा झाले पाहिजेत. तसेच आदरणीय शरद पवार साहेबांनी पत्रात मांडल्याप्रमाणे शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 1 लाख रुपयांची थेट भरपाई मिळाली पाहिजे,” अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी