Headlines

नेवपूर शाळेला 5 सायकली अन् हँडवॉश स्टेशनची भेट:रोटरी क्लब छत्रपती संभाजीनगर पूर्वचा पुढाकार‎




कन्नड ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या आरोग्य व स्वच्छतेची काळजी घेण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब छत्रपती संभाजीनगर पूर्व यांच्या वतीने कन्नड तालुक्यातील चिंचोली बीटमधील उपक्रमशील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा, नेवपूर येथे ‘एज्युराइड’ उपक्रमांतर्गत पाच सायकली व ‘हँडशील्ड’ अंतर्गत एक हँडवॉश स्टेशन भेट देण्यात आले. १७ ऑक्टोबर रोजी रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा हस्तांतरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे अध्यक्ष पवन गुट्टे, माजी अध्यक्ष निवृत्ती गजभारे, ज्येष्ठ सदस्य प्रदीप पटेल, कोषाध्यक्ष सतीश भालशंकर व प्रकल्पप्रमुख दिनेश जायसवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच करंजखेडा केंद्रप्रमुख के. आर. सपकाळ, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोकराव सोळुंके, प्रतिष्ठित नागरिक मनोज देशमुख, ज्ञानेश्वर सुरडकर, शिक्षणप्रेमी गजानन खेळवणे, अप्पा खेळवणे, शिक्षक प्रवीण जैस्वाल व दीपक पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक नरेश पेद्दी, पदवीधर शिक्षक संतोष कांबळे, अंजली मेश्राम, दीपक भोटकर, स्वप्ना पाटील, राहुल देशमुख, हनुमान जाधव, विठ्ठल गायके, गणेश मोकासे, सागर काटकर, ज्ञानेश्वर सपकाळ, अमोल तागावले, चेतन देशमुख, बबन देशमुख व संध्या देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवनाथ वाढेकर यांनी केले. हनुमान जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती, सर्व शिक्षकवृंद व नेवपूर गावातील ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. स्वच्छतेसाठी हँडवॉश स्टेशनची सुविधा : विद्यार्थ्यांच्या आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारे एक हँडवॉश स्टेशनही शाळेला भेट देण्यात आले. हात स्वच्छ ठेवण्याची सवय विकसित करणे. विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे. यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरेल. सायकली व हँडवॉश स्टेशनच्या माध्यमातून शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये भर पडली आहे. नेवपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील पाच विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. चिठ्ठी पद्धतीने विद्यार्थिनींना सायकलींचे केले वितरण रोटरी क्लबच्या ‘एज्युराइड’ उपक्रमांतर्गत शाळेतील सायकल बँक समृद्ध करण्यासाठी पाच सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या. इयत्ता दहावीतील विद्यार्थिनींना चिठ्ठी पद्धतीने या सायकलींचे वाटप करण्यात आले. यामध्ये सरू चिकणे, सप्तेश्वरी ससे, कोमल मुरमुडे, दीपाली ठाकरे व वैष्णवी चिकणे या विद्यार्थिनींचा समावेश आहे. भविष्यातही शाळेला सहकार्य करण्याचा मानस या वेळी रोटरी क्लबचे विद्यमान अध्यक्ष पवन गुट्टे यांनी भविष्यातही शाळेच्या गरजा लक्षात घेऊन अधिकाधिक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला. सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक संस्थांना सहकार्य करण्याच्या रोटरी क्लबच्या भूमिकेचे उपस्थितांनी स्वागत केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *