Headlines

‘पदवीधर’मध्ये पाठिंब्यासाठी उद्धव ठाकरेंना भेटणार- शिंदे:‘मविआ संपूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरणार’




विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पाठिंबा द्यावा म्हणून उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले. पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडी संपूर्ण ताकदीनिशी निवडणुकीला सामोरी जात आहे. एवढी वर्षे आमदार राहिल्यानंतरही महायुतीचे उमेदवार आमदार सतीश चव्हाण यांना अनेक वर्गाच्या समस्या अद्याप सोडवण्यात यश आलेले नाही. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर पदवीधर मतदारांचा पाठिंबा मिळत असल्याचा दावा आमदार शिंदे यांनी केला. महायुतीकडून लढणारे चव्हाण यापूर्वी आपल्या पक्षात होते आणि आता आपणच त्यांच्यावर विकासकामे केली नसल्याचे सांगत आहात, असे विचारले असता त्या वेळी काय घडले ही तेव्हाची बाब होती. आज ते आमच्याविरोधात आहेत, असे शिंदे म्हणाले. काँग्रेसचा राष्ट्रवादीला पाठिंबा पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे उपस्थित होते. माझा पाठिंबा डॉ. प्रतापसिंह पाटील यांनाच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून पाटील यांना पाठिंबा जाहीर केला असल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *