Headlines

गोदावरी नदीत उडी घेण्याचा प्रयत्न; बंधारे भरण्यासाठी आंदोलन तीव्र:शेतकरी बाळासाहेब घोगरे यांना आंदोलकांनी वेळीच रोखले‎




महांका ळवडगाव आणि नागमठाणला जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलावर बंधारे भरून देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन शनिवारी (१७) अधिक तीव्र झाले. मागण्यांकडे लक्ष दिले जात नसल्याने संतप्त झालेल्या महांका ळवडगाव येथील शेतकरी बाळासाहेब घोगरे यांनी पुलावरून नदीत उडी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित शेतकरी आणि आंदोलकांनी त्यांना तातडीने पकडून मागे खेचल्याने अनर्थ टळला. गोदावरी नदीवरील वांजरगाव, खानापूर आणि कमलपूर येथील केटी बंधाऱ्यांवर परिसरातील अनेक गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. नागमठाण, आवलगाव, हमरापूर, बाजाठाण, शनिदेवगाव, चांदेगाव, डागपिं पळगाव, भालगाव, सराला, गोवर्धन, महांका वडगाव, खानापूर आणि भामाठाण या गावांसह वैजापूर व श्रीरामपूर तालुक्यांतील पाणीटंच ईग्रस्त किमान १०० गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पशुधनाच्या पाण्याची गरजही या बंधाऱ्यांवर अवलंबून आहे. नांदूर- धमेश्वर येथून यापूर्वी पाणी सोडण्यात आले; मात्र, त्याचा अपेक्षित लाभ तिन्ही बंधाऱ्यांना मिळाला नसल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. त्यामुळे तिन्ही बंधारे तातडीने किमान ५० टक्के भरावेत, तसेच सोडलेल्या पाण्याची मात्रा, कालावधी आणि नियोजनाची माहिती लेखी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार हेमंत ओगले, वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे, तहसीलदार मिलिंद वाघ, शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे तसेच नाशिक व अहिल्यानगर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मात्र, शनिवारी सायंकाळपर्यंत तोडगा निघाला नव्हता. आंदोलकांच्या या आहेत प्रमुख मागण्या .वांजरगाव, खानापूर आणि कमलपूर हे तिन्ही केटी बंधारे तातडीने किमान ५० टक्के भरावेत. . नांदूर-मधमेश्वर येथून सोडलेल्या पाण्याची मात्रा, तारीख आणि कालावधीची लेखी माहिती द्यावी. . पाणी सोडूनही बंधाऱ्यांमध्ये अपेक्षित पाणी न पोहोचण्याची कारणे स्पष्ट करावीत. . वैजापूर व श्रीरामपूर तालुक्यांतील पाणीटंचाईग्रस्त गावांना पिण्याचे व जनावरांसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *