![]()
संस्थेतील अंतर्गत वादामुळे शासनमान्य शाळेचा ताबा न मिळाल्याने मूळ शाळेपासून अवघ्या ८५० मीटर अंतरावर शेतात त्याच नावाने बेकायदा दुसरी शाळा सुरू करून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. साजापूर रोड, वडगाव कोल्हाटी परिसरातील ज्ञानगंगा पब्लिक स्कूलच्या १३ संचालकांविरुद्ध शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे शिक्षण विभागाने या शाळेवर ठोठावलेला २ कोटी ७ लाख ८० हजार रुपयांचा दंडही संचालकांनी भरला नसल्याचे उघड झाले आहे. रवींद्र भाईदास पाटील, मंजूषा नितीन उपासनी, योगेश विनायकराव पाटील, विनायकराव वामनराव पाटील, छाया योगेश पाटील, वसंत मांगो राठोड, स्मिता विनायकराव पाटील, शालिनी रणधीर निकम, अंजली राजेंद्र कोलते, माधुरी विजय जाधव, राणी पांडुरंग जाधव, रेखा रवींद्र पाटील आणि परेश विनायकराव पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. शाळेला २ कोटी ७ लाख रुपयांचा दंड शिक्षण विभागाने २०२०, २०२१, २०२३ आणि २०२५ मध्ये केलेल्या तपासणीत शाळेकडे प्राथमिक शिक्षण विभागाचे मान्यता प्रमाणपत्र नसल्याचे स्पष्ट झाले होते. १९ एप्रिल २०२१ रोजी चौकशी समितीने या शाळेला अनधिकृत घोषित केले होते. शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चौकशी अहवालान्वये शाळेवर १ कोटी ६५ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र, संचालकांनी हा दंड जमा केला नाही. १० ऑगस्टच्या आदेशानुसार ही दंडाची रक्कम वाढून तब्बल २ कोटी ७ लाख ८० हजार रुपयांवर पोहोचली आहे.
Source link
मूळ शाळेच्या नावानेच 850 मीटरवर दुसरी शाळा; 13 संचालकांवर गुन्हा:वडगाव कोल्हाटीतील प्रकार; शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची पोलिसांत तक्रार