![]()
मराठा समाजाला आरक्षण मिळतनसल्याच्या तीव्रचिंतेतून फुलंब्रीतालुक्यातील पालयेथील एका ३५वर्षीय युवकानेटोकाचे पाऊलउचलत आपलीजीवनयात्रासंपवली. अनिलअन्साराम जाधव (वय ३५) असेमृत युवकाचे नाव असून, रविवाररोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास हीदुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अनिलजाधव यांनी आपल्या राहत्या घरातगळफास घेऊन आत्महत्या केली.मराठा समाजाला अद्याप आरक्षणमिळत नसल्याच्या नैराश्यातून त्यांनीहे कृत्य केल्याची चर्चा सध्याग्रामस्थांमध्ये आणि परिसरात सुरूआहे. या घटनेची माहिती मिळताचफुलंब्री पोलिस ठाण्याचे पथकतातडीने घटनास्थळी दाखल होतसदरील तरुणाला फुलंब्री येथीलशासकीय रुग्णालयात दाखलकरण्यात आले असता डॉक्टरांनीत्याला मृत घोषित केले,शवविच्छेदन करून रात्री ७ वाटेच्यासुमारास त्यांच्यावर शोकाकुलवातावरणात अंत्यसंस्कार करण्यातआले. फुलंब्री पोलिस ठाण्यातसदरील घटनेची नोंद करण्यातआली आहे. या दुर्घटनेमुळे पालपरिसरात शोककळा पसरली असूनसर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान घटनेमुळे पालसह परिसरातखळबळ उडाली आहे.
Source link
मराठा समाजाला आरक्षणमिळत नसल्याने आत्महत्या:फुलंब्री तालुक्यातील पाल येथील हृदयद्रावक घटना