![]()
एकीकडे दुष्काळाचे सावट गडद होत असताना दुसरीकडे पशुधन जगवायचे कसे, असा गंभीर प्रश्न पैठण तालुक्यातील पशुपालकांसमोर उभा राहण्याची शक्यता आहे. तालुक्यात गाय, म्हैस, शेळी आणि मेंढी मिळून तब्बल एक लाख तीन हजारांहून अधिक पशुधन आहे. मात्र, उपलब्ध चारा केवळ ७० दिवस पुरेल, अशी स्थिती असल्याने आगामी काळातील चारा व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाची अनिश्चितता, शेतीपिकांवरील संकट आणि चाऱ्याच्या मर्यादित उपलब्धतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर पशुपालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे,पैठण तालुक्यातील पशुधनाची आकडेवारी पाहता, ग्रामीण अर्थव्यवस्थेत पशुपालनाचे महत्त्व स्पष्ट होते. तालुक्यात ४६ हजार ८०८ गायी, ९ हजार ७५ म्हशी, ३६ हजार ६३८ शेळ्या आणि ७ हजार ४८१ मेंढ्या आहेत. या आकडेवारीनुसार एकूण पशुधनाची संख्या एक लाख तीन हजारांवर पोहोचते. अनेक शेतकऱ्यांसाठी दुग्धव्यवसाय हा शेतीला आर्थिक आधार देणारा महत्त्वाचा पूरक व्यवसाय आहे. शेळी-मेंढीपालनातूनही ग्रामीण कुटुंबांना उत्पन्न मिळते. मात्र, चारा उपलब्ध न झाल्यास या व्यवसायांवर थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे चारा टंचाईचा प्रश्न केवळ पशुधनापुरता मर्यादित नसून, तो शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नाशीही जोडलेला आहे. उपलब्ध चारा जेमतेम ७० दिवस पुरणार असेल असे पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले मात्र त्यानंतर पशुधनासाठी चारा कुठून उपलब्ध करायचा, हा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे. दुष्काळी परिस्थितीत हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी होण्याची शक्यता असते. पिकांचे नुकसान झाल्यास शेतातील कडबा आणि इतर चारा स्रोतांवरही परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत पशुपालकांना बाहेरून चारा खरेदी करावा लागल्यास त्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. दूध उत्पादनावर परिणाम झाला, तर दुग्धव्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नालाही फटका बसू शकतो. चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात : सभापती वैशाली बोंबले यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील गावपातळीवर चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात यासाठी आमदार विलास भुमरे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून चारा छावण्या लवकर सुरू करण्यासाठी केले जात प्रयत्न आहे. चारा छावण्यांपासून पर्यायी नियोजनापर्यंत तयारी संभाव्य चारा टंचाईचा विचार करून प्रशासनाने तालुक्यातील चाऱ्याच्या उपलब्धतेचा सविस्तर आढावा अद्याप घेतला नाही. उपलब्ध साठा, आगामी काळातील गरज आणि संभाव्य तुटवडा बघता चार चारा छावण्या सुरू करण्याचे नियोजन असल्याचे पंचायत समितीचे सहायक गट विकास अधिकारी राजेश कांबळे यांनी सांगितले. गरजेनुसार चारा उत्पादनासाठी पर्यायी नियोजन, चारा उपलब्ध असलेल्या भागांतून पुरवठ्याची शक्यता, पशुपालकांना आवश्यक मदत आणि चारा छावण्यांची पूर्वतयारी या बाबींच्या सूचना आमदार विलास भुमरे यांनी दिल्या आहेत. चारा-पाण्याचे नियोजन सुरू Ãपैठण तालुक्यातील एक लाखांहून अधिक पशुधनाची संख्या आणि अवघ्या ७० दिवसांचा उपलब्ध चारा यांची सांगड घालताना प्रशासनापुढील आव्हान स्पष्ट होते. संभाव्य दुष्काळी परिस्थितीत पिण्याच्या पाण्याबरोबरच पशुधनाच्या चाऱ्याची उपलब्धतेवर काम सुरू करण्यात आले आहे. -राजेश कांबळे, सहाय्यक गट विकास अधिकारी
Source link
पैठण तालुक्यातील चाऱ्याचा प्रश्न; केवळ 60 दिवस पुरेल एवढा चारा:तालुक्यातील दूध उत्पादनावर होणार परिणाम, शेतकऱ्यांचा खर्चही वाढणार