Headlines

20 लाखांपर्यंतच्या 700 चार चाकी बूक, शेतकऱ्यांकडून लहान ट्रॅक्टरला मागणी:सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी बुकिंग करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी‎




चारचाकी वाहनांच्या खरेदीत मागील वर्षाच्या तुलनेत १२ ते १५ टक्क्यांनी वाढ झाली असून, दसऱ्याच्या मुहूर्तावर तब्बल ७०० कारचे बुकिंग झाले आहे. ग्राहकांचा कल २० लाख रुपयांपर्यंतच्या कार खरेदीकडे अधिक असून, त्यात सीएनजी आणि ईव्ही (इलेक्ट्रिक वाहने) गाड्यांची मागणी सर्वाधिक आहे. दुचाकी वाहनांच्या बाजारपेठेत मागील वर्षाच्या तुलनेत २५ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. १ ते २ लाख रुपये किमतीच्या प्रीमियम दुचाकींना जास्त मागणी आहे. या दसऱ्यानिमित्त तब्बल २५०० दुचाकींचे बुकिंग झाले असून तेवढ्या गाड्या नव्याने रस्त्यावर धावणार आहेत. अशी माहिती वाहन वितरक नितीन बिज्जरगी यांनी दिली. ग्रामीण भागात दुचाकीसह ट्रॅक्टरला मागणी अधिक होती. अकलूज | सीमोल्लंघनासाठी लागणाऱ्या फुले व आपटा विक्रीच्या छोट्या छोट्या दुकानांनी शहरातील विजय चौक, जुने पोलीस ठाणे, सदुभाऊ चौक तसेच यशवंतनगर आदी ठिकाणी गर्दी केली होती. आपट्याचे महत्व असल्याने नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. बाजारात पिवळ्यापेक्षा लाल झेंडूला मागणी होती. लाल झेंडू ५० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत तर लहान मोठे हार ४० रुपयांपासून १२५ रुपयांपर्यंत विकले. { मागील वर्षी १४७५ रुपये तोळा असलेली चांदी आता २१४० रुपयांवर पोहचली आहे. { दसऱ्याच्या मुहूर्तावर मंगळसूत्र, कोल्हापुरी साज, पाटल्या, तोडे आणि नथ यांसारख्या पारंपरिक दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. { दैनंदिन वापरासाठी वजनाने हलक्या ब्रेसलेटला मागणी होती. स्वतःचे घर असावे या स्वप्नपूर्तीसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधत ग्राहकांनी रेडी पझेशन घरांना अधिक पसंती दिली आहे. शहरात ओपन प्लॉट आणि रो-हाऊसेसला मोठी मागणी आहे.५० ते ९० लाख रुपये किमतीच्या लक्झरियस घरांना आणि फ्लॅट्सना ग्राहकांची पसंती मिळत असून आतापर्यंत तब्बल ५०० घरांचे बुकिंग झाले आहे. ^ दु़ष्काळाचे सावट जाणवत आहे. यावेळेस किमान २०० गाड्यांची विक्री होईल, असा अंदाज आहे. शोरूममध्ये गाड्यांचा स्टाँक भरपूर आहे. -विजय कादे, सुमनकीर्ती शोरूम,पंढरपूर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *