Headlines

कौतुकास्पद कामगिरी:पोलिस क्रीडा स्पर्धेत मुख्यालयाचे वर्चस्व; रोहन गावंडे ‘उत्कृष्ट खेळाडू’, धावणे, उंच उडीत रोहनची बाजी; मुख्यालयाला विजेतेपद‎




जिल्हा पोलिस दलाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय जिल्हास्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धा २०२६ चा समारोप पोलिस मुख्यालयात शनिवारी पार पडला. १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या या क्रीडा महोत्सवात सर्वसमावेशक खेळाचे प्रदर्शन घडवत अकोला पोलिस मुख्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावून वर्चस्व सिद्ध केले. वैयक्तिक कामगिरीत दमदार चमक दाखवणारा खेळाडू रोहन गावंडे यांना स्पर्धेतील ‘उत्कृष्ट खेळाडू’ म्हणून गौरवण्यात आले. पोलिस अधिकारी व अंमलदारांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, सांघिक भावना, शिस्त आणि खेळाडूवृत्ती वृद्धिंगत व्हावी, यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली. समारोपीय कार्यक्रमास पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी उपस्थित होते. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते विविध क्रीडा स्पर्धांतील विजेत्यांना चषक व पदके देऊन सन्मानित करण्यात आले. या महोत्सवात १००, २००, ४००, ८०० व १५०० मीटर धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, भालाफेक व थाळीफेक आदी विविध मैदानी स्पर्धा पार पडल्या. याशिवाय पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी रस्सीखेच, तर पोलिस कुटुंबातील सदस्यांसाठी संगीत खुर्चीसारखे आनंददायी उपक्रमही घेण्यात आले. स्पर्धेत पोलिस मुख्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले, तर शहर विभागाच्या संघानेही उल्लेखनीय खेळ दाखवला. सूत्रसंचालन गोपाळ मुकुंदे यांनी केले, तर आभार अप्पर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनी मानले. आयोजनाच्या यशस्वितेसाठी राखीव पोलिस निरीक्षक गणेश जुमनाके, गेम इन्चार्ज रवी ठाकूर आणि त्यांच्या चमूने विशेष परिश्रम घेतले. उत्कृष्ट खेळाडू: रोहन गावंडे. १०० मीटर धावणे (अंतिम विजेते): रोहन गावंडे व पूजा मुंढे. २०० मीटर धावणे: पुरुष – प्रथम: रोहन गावंडे, द्वितीय: वैभव गावंडे. महिला- प्रथम: पूजा ककाळ, द्वितीय: पायल भालवी. ४०० मीटर धावणे: पुरुष- प्रथम: संतोष ठाकरे, द्वितीय: किरण काळे. महिला – प्रथम: मुक्ता गरज, द्वितीय: कोमल नागरगोजे. ८०० मीटर धावणे: पुरुष- प्रथम: शिवकुमार श्रीरामे, द्वितीय: मंगेश चव्हाण. महिला- प्रथम: निकिता गोपाळ, द्वितीय: दुर्गा काळे. १५०० मीटर धावणे: पुरुष- प्रथम: शिवकुमार श्रीरामे, द्वितीय: मुंजाजी भडके. महिला- प्रथम: भाग्यश्री काळे, द्वितीय: काजल विभुते. लांब उडी: पुरुष- प्रथम: शुभम जगताप, द्वितीय: वैभव गावंडे, महिला- प्रथम: कोमल नागाने, द्वितीय: मुक्ता गरज. उंच उडी: पुरुष- प्रथम: रोहन गावंडे, द्वितीय: शुभम केकन. महिला – प्रथम: पल्लवी सिहोरे, द्वितीय: निकिता मसराम. गोळाफेक: पुरुष – प्रथम: आदित्य पाटील, द्वितीय: महेश धांडे. महिला- प्रथम: मनीषा शिंदे, द्वितीय: मीना थाबे. भालाफेक: पुरुष – प्रथम: महेश धांडे, द्वितीय: अंकुश थानेथर.महिला- प्रथम: मीना थाबे, द्वितीय: पूजा बोरकर. थाळीफेक (महिला): प्रथम: कोतवाल श्रीन, द्वितीय: रूपाली मदनसांगी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *