Headlines

भाईंदरमध्ये गरबा खेळताना काळाचा घाला:30 वर्षीय रिअल इस्टेट व्यावसायिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू




नवरात्रोत्सव म्हटला की देवीच्या आराधनेसह गरबा आणि दांडियाच्या तालावर रंगणारा उत्साह डोळ्यांसमोर येतो. नऊ दिवस सुरू असलेल्या या उत्सवाची सांगता होत असतानाच मीरा-भाईंदर परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भाईंदर पश्चिम येथे नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित गरबा कार्यक्रमात सहभागी झालेल्या 30 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मीत रुपडा असे या तरुणाचे नाव असून, रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. गरबा खेळत असताना अचानक छातीत दुखू लागल्याने तो खाली कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गरबा खेळताना अचानक छातीत दुखू लागले मिळालेल्या माहितीनुसार, मीत रुपडा हा भाईंदर पश्चिम येथील शिवसेना गल्लीतील पूनम अपार्टमेंटमध्ये आपल्या आई-वडिलांसोबत राहत होता. तो रिअल इस्टेट व्यवसायात कार्यरत होता. रविवारी रात्री तो भाईंदर पश्चिम येथे आयोजित करण्यात आलेल्या लोटस नवरात्रोत्सवात सहभागी होण्यासाठी गेला होता. या उत्सवाचे आयोजन भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी केले होते. नवरात्रोत्सवातील गरबा आणि दांडिया कार्यक्रमात सहभागी झालेला मीत इतरांप्रमाणे उत्साहाने नृत्य करत होता. मात्र, रात्री साडेअकराच्या सुमारास दांडिया खेळत असताना अचानक त्याच्या छातीत दुखू लागले. काही क्षणांतच त्याची प्रकृती बिघडली आणि तो खाली कोसळला. कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्यांना या प्रकारामुळे धक्का बसला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला तातडीने उपचारासाठी भाईंदर येथील तुंगा रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू मीतला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, डॉक्टरांचे प्रयत्न सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. उत्सवाच्या वातावरणात घडलेल्या या अनपेक्षित घटनेने उपस्थितांनाही मोठा धक्का बसला. नवरात्रोत्सवात सहभागी होण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणाचा काही वेळातच मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भाईंदर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनलकर यांनी मीतचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती दिली. या घटनेमुळे नवरात्रोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले असून, परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. तरुणाच्या अचानक मृत्यूने परिसरात हळहळ मीत रुपडा हा रिअल इस्टेट व्यवसायात कार्यरत होता. त्याची प्रकृती चांगली होती आणि त्याला कोणताही आजार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीय, मित्रपरिवार आणि परिचितांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, नृत्य आणि उत्सवाच्या आनंदात सहभागी असताना अशी दुर्घटना घडल्याने परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे. नवरात्रोत्सवात गरबा आणि दांडिया खेळताना शारीरिक हालचाली वाढतात. अशा वेळी छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर येणे किंवा अचानक अशक्तपणा जाणवणे यांसारखी लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे आहे. मीतच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या दुर्दैवी घटनेने भाईंदर परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. हेही वाचा… शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही:दसरा मेळाव्याआधी शिंदेंचा मोठा निर्णय; शेकडो ट्रक दुष्काळग्रस्त भागात रवाना यंदाच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा केली आहे. “शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही,” असा शब्द देत शिवसेनेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागासाठी दिवाळीचा शिधा घेऊन जाणारे शेकडो ट्रक आज रवाना करण्यात आले. तसेच, शेतकरी कुटुंबातील मुलींच्या लग्नाची जबाबदारीही शिवसेना घेणार असल्याचे एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *