Headlines

Sushma Andhare Targets Fadnavis Over Mumbai Law and Order


“एकेकाळी 1993-95 च्या काळात मनोहर जोशी आणि गोपीनाथराव मुंडे यांच्या युती सरकारने बुलेट फॉर बुलेटचे धोरण स्वीकारून मुंबईतील अंडरवर्ल्डचे कंबरडे मोडले होते. मात्र, आज सत्तेसाठी लाचार झालेली भाजप गुन्हेगारांपुढे हतबल झाली आहे. भर रस्त्यात बाबा सिद्दिकीं

.

दादर येथील शिवतीर्थावर आयोजित शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या भव्य दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी राज्यातील भीषण दुष्काळ, मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या, एमपीएससी (MPSC) परीक्षेतील 615 बोगस पीएसआय (PSI) घोटाळा, बिश्नोई गँगचे भाजपशासित राज्यांमधील जाळे आणि सरकारच्या कारभारावर टीका केली.

सॅटेलाईटने नव्हे, बांधावर जाऊन मदत द्या!

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना सुषमा अंधारे यांनी सरकारवर तीव्र संताप व्यक्त केला. “गेल्या 150 वर्षांत दिसला नाही असा भीषण दुष्काळ आज महाराष्ट्रात पाहायला मिळतोय. माझी आजी-आजोबा 1972 च्या दुष्काळाची आठवण करून द्यायचे; पण आजची परिस्थिती 1972 पेक्षाही भीषण आहे. थोडा पाऊस पडल्याने मातीवर गवत उगवले म्हणून सॅटेलाईट चित्रात जमीन हिरवी दिसते, पण खाली पीक पूर्णपणे जळून खाक झाले आहे. हे सरकार सॅटेलाईट सर्व्हे करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे.”

पोळ्याच्या दिवशी 48 आत्महत्या

“मराठवाड्यात यंदा बैलपोळ्याच्या एकाच दिवशी तब्बल 48 शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्या. मात्र, या 48 बळींवर सरकार चकार शब्दही काढत नाही. शेतकऱ्यांना चारा छावण्यांच्या नावाखाली पुन्हा मिंधे आणि भाजपचे दलाल पोसण्याची गरज नाही. छावण्यांऐवजी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात किंवा बांधावर चारा व रोख मदत पोहोचवा.”

सत्ताधाऱ्यांची उधळपट्टी

“देवेंद्र फडणवीस जनतेला काटकसरीने वागण्याचे सल्ले देतात. हा सल्ला आधी तुमच्या नेत्यांना द्या. प्रवीण दरेकर गरब्यात कोट्यवधी रुपये उधळून ठुमके लावतात, छत्रपती संभाजीनगरात ओएसडी आमदारकीच्या हव्यासापोटी सेवा सप्ताहाच्या नावाखाली लाखो लिटर पाणी वाया घालवून कोट्यवधींची उधळपट्टी करतात, मीरा-भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता वाढदिवसावर उधळपट्टी करतात आणि कैलास गोरंट्याल नोटा उधळत नाचतात; मग सामान्य शेतकऱ्यानेच काटकसर का करायची?”

615 बोगस पीएसआय भरले, प्रत्येकाकडून 18 लाख लाटले

स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहारांवर बोट ठेवत त्यांनी थेट गृहखात्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला. “शेतकऱ्यांचे पोर शहरात येऊन अभ्यास करते, पण रोज पेपर फुटतात. सरकारने एमपीएससीच्या 9 परीक्षांसाठी चौकशी समिती नेमली; मात्र ज्या परीक्षेत तब्बल 615 पीएसआय (पोलीस उपनिरीक्षक) बोगस पद्धतीने भरले गेले, त्या परीक्षेचा समावेश या चौकशीत जाणीवपूर्वक करण्यात आला नाही. एका एका जागेसाठी 18 लाख रुपये गोळा करण्यात आले. याचे सर्व व्हॉट्सॲप चॅट आणि लेखी पुरावे आम्ही सादर केले आहेत.”

गृहखात्यातील साटलोटं

“हे गृहखाते स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यांच्याच विभागातील बडे सचिव, सहसचिव आणि प्रशासकीय अधिकारी या घोटाळ्यात सामील असल्यानेच या 615 बोगस पीएसआयच्या गैरव्यवहारावर पांघरूण घातले जात आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला.

गृहमंत्रालय वाकोल्या दाखवणाऱ्यांना रोखू शकत नाही!

बॉलिवूड कलाकारांवरील हल्ले आणि गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या दहशतीचा पाढा वाचताना त्यांनी धक्कादायक राजकीय संदर्भ जोडले. “लॉरेन्स बिश्नोई ज्या जेलमध्ये बसून संपूर्ण गँग ऑपरेट करतो, ते साबरमती जेल गुजरातमध्ये आहे; तिथे सत्ता भाजपची आहे. दुसरा हस्तक अनमोल बिश्नोई ज्या तिहार जेलशी संबंधित आहे, ती दिल्ली भाजपच्या अखत्यारीत आहे. टायगर श्रॉफ गोळीबारात पकडलेला आरोपी बिहारचा, तिथे सत्ता भाजपची; दुसरा हरियाणाचा, तिथे सत्ता भाजपची; आणि ही घटना घडली महाराष्ट्रात, तिथेही सत्ता भाजपचीच! हे सर्व भाजपच्या राजवटीत बिनदिक्कतपणे गुन्हे करत आहेत.”

पोलिसांच्या वर्दीचा अनादर

“ठाण्यात आमचा कडवट शिवसैनिक प्रदीप पुर्णेकर मारला गेला. 302 ची आरोपी असणारी महिला जाहीर पत्रकार परिषद घेते आणि फडणवीसांचे पोलीस तिला सुरक्षा देतात. एसआयटी (SIT) मध्ये 23 अधिकारी असूनही तपास शून्य आहे. एका वर्षापूर्वी दसरा मेळावा संपताच बाबा सिद्दीकींची हत्या झाली; आज वर्ष उलटले तरी गृहखाते पाळेमुळे खणून काढू शकले नाही.”

पुणे शिक्षक मतदारसंघाचा अर्ज न वाचवू शकणारे मुख्यमंत्री काय होणार?

मिंधे गटाच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याच्या दिलेल्या घोषणांवर त्यांनी जोरदार टोला लगावला. “मिंध्यांचे मंत्री म्हणतात की शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार. मग फडणवीस कुठे जाणार, हे ते सांगत नाहीत. ज्या साहेबांना पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या दबावापुढे आपल्या साध्या एका अपक्ष कार्यकर्त्याचा उमेदवारी अर्जही वाचवता आला नाही, ते कसले मुख्यमंत्री होण्याच्या बाता मारतात? ज्यांच्यात कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहण्याचे गट्स नाहीत, त्यांनी सत्तेची स्वप्ने पाहू नयेत.” धाराशिवमध्ये एक गद्दार निघाला म्हणून निष्ठा संपत नाही; कैलास पाटलांसारखे इमानदार वाघ आजही उद्धव साहेबांसोबत ठाम उभे आहेत. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि शिवसेनेसाठी आम्ही अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

——————————————————–

हेही वाचा…

शिवतीर्थावर ठाकरे गटाचा दसरा मेळावा: राऊत, अंबादास दानवे दाखल; सुषमा अंधारे म्हणाल्या- बैलपोळ्याच्या दिवशी 48 शेतकऱ्यांच्या आत्महत्या तरीही सरकार गप्प

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा पारंपरिक दसरा मेळावा आज दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. शिवतीर्थावर होणाऱ्या या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिवसेनेत 2022 मध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र दसरा मेळावे होत आहेत. त्यामुळे शिवतीर्थावरील मेळावा हा केवळ परंपरेचा भाग नसून, शिवसेनेचा वारसा आणि पक्षाची राजकीय ताकद दाखवण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जात आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.