Headlines

‘रहीम नाराज होईल म्हणून रामाचे नाव घेत नाहीत’:राज्यपाल बागडे यांची संभाजीनगरमध्ये उत्तर भारतीय संघाच्या रावणदहन कार्यक्रमात विरोधकांवर टीका



“गेल्या ५०० वर्षांपासून भारतीय लोक ज्याची वाट पाहत होते ते राम मंदिर पूर्ण झाले आहे. भारतीय लोकांचे स्वप्न पूर्ण झाले.मात्र काही लोक मुद्दाम तेथे जात नाहीत. काही लोक रामाचे नाव घेत नाहीत. ते स्वतःला हिंदू समजतात, मात्र रामाचे नाव घेत नाहीत. रामाचे ना

.

उत्तर भारतीय संघाच्या वतीने आयोजित रावणदहन कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते. या वेळी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, महापौर समीर राजूरकर, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, नगरसेवक शिवाजी दांडगे, उद्योगपती एन. के. गुप्ता आणि डॉ. शेखर देसरडा यांची उपस्थिती होती.

विरोधकांच्या मवाळ भूमिकेवर ठेवले बोट

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी उद्धवसेनेवर अप्रत्यक्षपणे टीका केली. उद्धव ठाकरे यांची शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखली जाते. मात्र मविआत गेल्यामुळे त्यांनी ही भूमिका मवाळ केली. त्यामुळे बागडे यांनी त्यांच्या या राजकारणावर टीका केली तसेच राम-रहीमचा उल्लेख करत उद्धवसेनेच्या भूमिकेवर बोट ठेवले.

वाहतूक कोंडीत मंत्री

कार्यक्रम संपल्यानंतर मैदानाबाहेर अचानक नागरिकांची मोठी गर्दी झाली. गर्दीमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत ओबीसी विकासमंत्री अतुल सावे आणि इतर नेते अडकले. कार्यक्रमाच्या बाहेरच प्रचंड गर्दी झाल्यामुळे मंत्र्यांच्या वाहनांना जाण्यास अडथळा निर्माण झाला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *