Headlines

आईचा निरोप घेताना डोळे पाणावले; गडावरून महिलांचा परतीचा प्रवास:मोहटादेवी गडावर अनुष्ठान पूर्ण;1 हजार महिलांनी सोडला उपवास‎



“वर्षानुवर्षे तुझी अशीच सेवा घडू दे, आई… घरात सर्वांना सुख, समृद्धी आणि भरभराट लाभू दे!” अशी मनोभावे प्रार्थना करत शारदीय नवरात्रोत्सवात घटस्थापनेपासून खडा पहारा व घटी बसलेल्या महिला भाविकांनी पाणावलेल्या डोळ्यांनी आणि जड अंतःकरणाने मोहटादेवीचा निर

.

श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर घटस्थापनेपासून राज्यभरातून आलेल्या सुमारे एक हजार महिला भाविकांनी सलग आठ दिवस कडक उपवास, खडा पहारा व घटी अनुष्ठान केले. या काळात पहाटे व सायंकाळची महाआरती, रात्री कीर्तन, गडाला प्रदक्षिणा, गड लोटांगण, देवीचे भजन आणि पारंपरिक आराधी नृत्य अशा विविध धार्मिक विधींमध्ये महिला भक्तीभावाने तल्लीन झाल्या होत्या. देवस्थान समितीच्या वतीने या सर्व महिलांची निवास आणि फराळाची चोख व्यवस्था करण्यात आली होती. अष्टमीला होमहवनाची पूर्णाहुती झाल्यानंतर महिलांनी आपल्या घरी जाऊन उपवासाची सांगता केली. या अनुष्ठानात मंदाबाई जाधव (तांबेगाव), ताराबाई कोल्हे (रायमोह), तुळसाबाई विर (पैठण) यांच्यासह मराठवाडा व विदर्भासह राज्यभरातून आलेल्या भाविक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

‘महिनाभर आधीच लागते गडाची ओढ’ ^”नवरात्रोत्सवाच्या महिनाभरापूर्वीपासूनच आम्ही येथे येण्याची जय्यत तयारी करतो. पोळा सण संपला की मोहटादेवीच्या दर्शनाची अनामिक ओढ लागते. आम्ही गावातील चार-पाच महिला दरवर्षी एकत्र येऊन गडावर सलग आठ दिवस हे खडतर अनुष्ठान पूर्ण करतो.” -सुरेखा म्हसे, भाविक महिला (राहुरी)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *