Headlines

मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गोळीबार:रानडुकराच्या शिकारीसाठी गेलेल्या टोळक्यातील एकाचा मृत्यू, दोघे जखमी




पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बेकायदा घुसखोरी करून रानडुकराची शिकार करणे एका टोळक्याला चांगलेच महागात पडले आहे. मध्यरात्रीच्या अंधारात प्राण्याचे डोळे समजून झाडलेल्या गोळीमुळे एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य दोन जण जखमी झाले आहेत. नेमकी घटना कशी घडली? मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास ५ ते ६ जणांचे एक टोळके रानडुकराची शिकार करण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ठाणे हद्दीतील येऊर रेंजच्या ‘चेना बीट’ परिसरात बेकायदेशीरपणे घुसले होते. या शिकारीसाठी त्यांच्याकडे बंदुका, छर्रे आणि अन्य घातक साहित्य होते. जंगलात अंधार असल्याने हे टोळके बॅटरीच्या प्रकाशात शिकार शोधत होते. याच वेळी अंधारात काहीतरी चमकताना दिसल्याने, ते प्राण्याचे डोळे आहेत असा समज करून एकाने त्या दिशेने थेट गोळीबार केला. मात्र, दुर्दैवाने ही गोळी प्राण्याला न लागता त्यांच्याच सोबत असलेल्या एका व्यक्तीला लागली, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या घटनेत अन्य दोघे जणही जखमी झाले आहेत. पोलिसांचा आणि वनविभागाचा तपास सुरू या घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि पोलिसांच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जंगलाच्या सीमेपासून साधारण ४५० मीटर आतमध्ये पोलिसांना रक्ताचे सडे पडलेले आढळून आले. या घटनेत मृत्यू झालेली व्यक्ती मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील बेलकारी पाडा येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. तर, जखमी झालेल्या दोन व्यक्तींवर काशीगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अत्यंत कडेकोट सुरक्षा असलेल्या नॅशनल पार्कमध्ये शिकारीसाठी हत्यारांसह टोळके आत घुसलेच कसे, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत असून पोलीस आणि वन विभाग या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. ——————— हेही वाचा.. टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण:पहिल्यांदा वाटलं टायर फुटला, नंतर वाटलं हॉर्ट अटॅक आलाय, रुग्णालयात समजलं गोळी लागलीय; जखमी उमेश चौहानचा धक्कादायक जबाब
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडवून दिली आहे. या घटनेत प्रत्यक्षदर्शी उमेश चौहान हा तरुण जखमी झाला असून, त्याने रुग्णालयातून या संपूर्ण घटनेचा थरारक घटनाक्रम सांगितला आहे. १८ ऑक्टोबरच्या संध्याकाळी नेमकं काय घडलं, याचा अंगावर काटा आणणारा अनुभव त्याने कथन केला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *