Headlines

BJP Mocks Uddhav Thackeray and Sanjay Raut as Laurel and Hardy


“शिवतीर्थावर काल पार पडलेला दसरा मेळावा हा बाळासाहेब ठाकरेंच्या प्रखर विचारांचे सोने लुटणारा नसून, ‘चला हवा येऊ द्या’ आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमांनाही लाजवेल असा निव्वळ ‘हसरा मेळावा’ ठरला आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची जोडी म्ह

.

अमित शहा हे देशाला ठाऊक; आधी भांडुपचा नगरसेवक निवडून आणा

संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केलेल्या आरोपांची खिल्ली उडवत नवनाथ बन म्हणाले, “अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवून तिथे शांतता प्रस्थापित केली, पाकिस्तानच्या घरात घुसून सर्जिकल स्ट्राईक करण्याची हिंमत दाखवली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वतः अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जाहीर कौतुक करतात. ज्यांची स्वतःची मर्यादा भांडुपमध्ये साधा स्वतःचा नगरसेवक निवडून आणण्याइतपत उरलेली नाही, त्यांनी देशाच्या गृहमंत्र्यांवर बोट दाखवू नये.”

कपिल शर्माचे दुकान बंद पाडणारी कॉमेडी

“संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंची ही ‘कॉमेडी गँग’ रोज अशी हास्यास्पद विधाने करत आहे की कपिल शर्माच्या कॉमेडी शोचा टीआरपी कमी होऊन यांच्या भाषणांचा टीआरपी वाढेल. जनतेने विधानसभेत, महापालिकेत आणि जिल्हा परिषदांमध्ये या पक्षाची आधीच राजकीय हत्या करून घरी बसवले आहे. ज्यांचे राजकीय अस्तित्वच जनतेने संपवले आहे, त्यांना आता वेगळे कोणी का संपवेल?”

15 आमदारांवर मुख्यमंत्री होता येत नाही!

संजय राऊतांनी ‘एप्रिलमध्ये सत्तांतर होणार’ असे भाकीत केल्याचा समाचार घेताना बन म्हणाले, “1 एप्रिलला लोकांना एप्रिल फूल केले जाते, तसेच संजय राऊत आता आपल्या उरलेल्या कार्यकर्त्यांना एप्रिल फूल करत आहेत. राहुल गांधींच्या लेझिमच्या तालावर नाचणाऱ्यांनी आम्हाला रेझिम चेंज शिकवू नये. 2022 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत सत्तापालट झाला, तेव्हा त्याचा साधा थांगपत्ताही उद्धव ठाकरेंना लागला नव्हता.”

144चा जादुई आकडा लागतो

“शिवसेनेतील नेते आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असे म्हणतात, ते पक्षवाढीसाठी स्वाभाविक आहे. मात्र, लोकशाहीत मुख्यमंत्री होण्यासाठी 144 आमदारांचे संख्याबळ लागते. भाजपकडे आज 137 आमदार असून देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहेत. उबाठा गटाकडे अवघे 15 आमदार शिल्लक असताना ते कोणत्या तोंडाने मुख्यमंत्रीपदाच्या बाता मारतात? हिंमत असेल तर आधी आगामी ग्रामपंचायत निवडणुका जिंकून दाखवाव्यात.”

232 आमदारांचे सामूहिक नेतृत्व

“2019 मध्ये युती म्हणून लढताना भाजपला 105 आणि ठाकरेंना 60 ते 65 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली भाजपने 137 जागा जिंकल्या, अजितदादांच्या राष्ट्रवादीला 55 आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही तेवढ्याच जागा मिळाल्या. त्यामुळे महायुतीला मिळालेल्या 232 जागा हे या तिन्ही नेत्यांचे सामूहिक यश आहे.”

सचिन वाझे, मनसुख हिरेन अन् 100 कोटींची वसुली विसरलात का?

महाविकास आघाडीच्या काळातील कायदा-सुव्यवस्थेची आठवण करून देत त्यांनी सुनावले. “कायदा-सुव्यवस्थेवर बोलताना उद्धव ठाकरेंनी आरशात पाहावे. सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्याकडून बड्या उद्योगपतीच्या घराबाहेर स्फोटके पेरली गेली, मनसुख हिरेन यांची हत्या झाली, पालघरमध्ये दोन निष्पाप साधूंना ठेचून मारण्यात आले आणि गृहमंत्री पदावर बसून पोलिसांमार्फत महिन्याला 100 कोटी रुपयांची उघड वसुली करण्यात आली. याउलट, देवेंद्रजींच्या काळात टायगर श्रॉफच्या घरावरील गोळीबारातील आरोपींना पोलिसांनी अवघ्या 48 तासांत बेड्या ठोकल्या.”

एपस्टीन फाईल नव्हे, पाटकर फाईल पाहा

“संजय राऊत आंतरराष्ट्रीय एपस्टीन फाईलचे दाखले देत आहेत; मात्र आधी त्यांनी स्वतःच्या ‘पाटकर फाईल’कडे लक्ष द्यावे. एका महिलेला अश्लील शिवीगाळ करणे, धमक्या देणे आणि तिचे पुस्तक रोखण्याचे कारनामे संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहेत. ते पुस्तक बाहेर आले तर राऊतांना तोंड लपवायला जागा उरणार नाही.”

महायुती सरकारचे थेट काम

शेतकरी मदत आणि मुंबईतील विकासावर बोलताना मुख्य प्रवक्त्यांनी महायुतीचा अजेंडा मांडला. “दुष्काळात एनडीआरएफच्या (NDRF) जाचक निकषांमुळे तातडीने मदत देता येत नव्हती. म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 5,000 रुपये तात्पुरती अग्रीम मदत जमा केली आहे. पंचनामे पूर्ण झाल्यावर उर्वरित पूर्ण भरपाई दिली जाईल. याशिवाय 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी आणि मोफत वीज देण्याचे काम सरकारने केले आहे. रोहित पवारांनी मोदींवर बोलण्याआधी आपले आजोबा शरद पवार देशाचे कृषिमंत्री असताना यवतमाळ व विदर्भात शेकडो शेतकरी आत्महत्या का करत होते, याचे आत्मपरीक्षण करावे.”

बीडीडी चाळीत 15 लाखांत घर

“मविआ सरकारने बीडीडी चाळ पुनर्विकासात घरांची किंमत 50 लाख रुपये ठेवली होती; मात्र देवेंद्रजींचे सरकार येताच ती किंमत अवघी 15 लाख रुपये करून मराठी माणसाला मुंबईतच हक्काचे घर दिले. प्रत्येक विकास प्रकल्पाला आणि डेटा सेंटरला विरोध करून कोकणाचा विकास रोखणे हाच उबाठाचा एकमेव उद्योग आहे,” असे सांगत त्यांनी विरोधकांच्या अपप्रचाराला चोख प्रत्युत्तर दिले.

——————————————————————–

हेही वाचा…

अमित शहाच लॉरेन्स बिश्नोईचे खरे सूत्रधार!:संजय राऊतांचा पुन्हा आरोप; म्हणाले- 500 कोटींवरून शिंदेंना EDने समन्स पाठवावे, हरदीप पुरींच्या फोटोंवरून ‘रेझिम चेंज’चा पुनरुच्चार

“देशभरातील गुन्हेगारी टोळ्या आणि माफियांचे जाळे भारतीय जनता पक्षाच्या छत्राखाली आणण्याचे काम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. गुजरातच्या साबरमती तुरुंगातून गँग चालवणारा लॉरेन्स बिश्नोई हा केवळ बाहुले असून, त्यामागील खरा चेहरा अमित शहा यांचाच आहे. देशात आता विरोधकांना संपवण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई गँगचा वापर राजकीय हत्यांसाठी होऊ शकतो,” असा अत्यंत गंभीर व खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.