![]()
राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत २१.०३ टक्क्यांनी घटला असून, तो ९०.५३ टक्क्यांवरून यंदा ६९.५० टक्क्यांवर आला आहे. सध्या राज्यातील धरणांमध्ये २८ हजार ३७५.२९ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध आहे. १३८ मोठ्या प्रकल्पांमध्ये ७७.४३ टक्के पाणीसाठा आहे, जो गतवर्षीच्या ९७.४० टक्क्यांपेक्षा १९.९७ टक्क्यांनी कमी आहे. प्रदेशनिहाय स्थितीत मोठी तफावत आहे. नागपूर, कोकण, पुणे आणि नाशिकमध्ये ८६ ते ९१ टक्के साठा आहे. याउलट, अमरावती विभागात ५८.५२ टक्के, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये केवळ ५६.४७ टक्के पाणी उपलब्ध आहे, जी सर्वात कमी स्थिती आहे. २६४ मध्यम प्रकल्पांमध्ये ६१.१५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे, जो गतवर्षीच्या तुलनेत किंचित वाढला आहे. पुणे प्रदेशातील मध्यम प्रकल्पांत सर्वाधिक ९२.३९ टक्के पाणीसाठा आहे.
Source link
राज्यातील धरणसाठ्यात वर्षभरात 21 टक्क्यांनी घट:मोठ्या प्रकल्पांत 77.43 टक्के, एकूण साठा 69.50 टक्क्यांवर; छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात कमी पाणी