![]()
कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध व्हावे आणि सणासुदीच्या काळात त्यांची आर्थिक अडचण दूर व्हावी, यासाठी उंडणगाव येथील बँक ऑफ बडोदा शाखेने विशेष पुढाकार घेतला आहे. विजयादशमी आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफीतील पात्र शेतक
.
शेतीचा हंगाम, पिकांसाठी लागणारा खर्च आणि सणासुदीच्या काळातील कौटुंबिक व आर्थिक गरजा लक्षात घेता, शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करून देण्यावर शाखेने विशेष भर दिला आहे. कर्जमाफीचा लाभ मिळूनही नवीन कर्जासाठी प्रतीक्षा करावी लागणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा या प्रयत्नातून यशस्वीपणे उद्देश साध्य होत आहे.
बँक ऑफ बडोदा शाखेचे व्यवस्थापक गजानन भिसे यांच्यासह शाखेतील अधिकारी व कर्मचारी हे शेतकरी कुटुंबातीलच आहेत. त्यामुळे शेतीतील अनिश्चितता, पावसाची दगाबाजी, दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींची त्यांना जवळून जाणीव आहे. या परिस्थितीची जाणीव ठेवून कर्जखाती बंद करणे, कागदपत्रांची पूर्तता करणे आणि नवीन पीककर्ज मंजुरीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी बँकेचे कर्मचारी दिवस-रात्र तसेच सुट्टीच्या दिवशीही काम करीत आहेत. शेतकऱ्यांप्रती असलेली आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी या कामातून दिसून येत आहे.
पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह संपर्क साधावा कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या ज्या शेतकऱ्यांचे नवीन पीककर्ज अद्याप प्रलंबित आहे, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह त्वरित बँक ऑफ बडोदा शाखेत संपर्क साधावा, असे आवाहन शाखाधिकारी गजानन भिसे यांनी केले आहे. नवीन पीक कर्जासाठी शेतकऱ्यांनी ७/१२ उतारा, एकूण जमिनीचा दाखला, फेरफार नोंदी, ओळख व पत्त्याच्या पुराव्यासाठी आवश्यक कागदपत्रे, बँक पासबुक, बँकेचा १३५ क्रमांकाचा फॉर्म आणि चतुःसीमेची माहिती सोबत आणावी. कागदपत्रांची पूर्तता करून पात्र शेतकऱ्यांनी नवीन पीककर्ज घेण्याच्या प्रक्रियेसाठी सहकार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.