Headlines

संगमनेरचा भोंदू गडगे, अशोक खरातहून 2 पाऊल पुढे:200 हून अधिक व्हिडिओ अन् 90 हून अधिक संशयास्पद औषधींचा जप्त; पुढे काय?




अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील भोंदूबाबा राजेंद्र बापू गडगे याने भोंदूगिरीच्या बाबतीत अशोक खरातलाही मागे टाकले आहे. पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई करत त्याचे 200 हून अधिक संशयास्पद व्हिडिओ व 90 हून अधिक औषधी जप्त केली आहेत. आता हे व्हिडिओ व औषधी तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. त्यातून अनेक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, राजेंद्र गडगे हा कॅन्सरसारखे दुर्धर आजार मंत्रशक्तीने बरे करण्याचा दावा करत होता. विशेषतः त्याच्यावर पुत्रप्राप्ती सारख्या अंधश्रद्धांना खतपाणी घालत महिला व त्यांच्या कुटुंबियांची फसवणूक केल्याचेही आरोप आहेत. या संदर्भात ग्रामीण रुग्णालयाकडून त्याला नोटीसही बजावण्यात आली आहे. या प्रकरणी गडगेसह डॉक्टर मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे, सूरज शिंदे व मधुकर शिंदे या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी गडगे व मधुकर शिंदे सध्या पोलिस कोठडीत आहेत. उर्वरित 3 जणांचा शोध सुरू आहे. डॉक्टर मोहन पुरी हा औषध पुरवठ्याचा प्रमुख सूत्रधार आहे. तो सध्या फरार आहे. बरे झाल्याचा दावा करणारेही चौकशीच्या फेऱ्यात प्रस्तुत प्रकरणात शेकडो महिला व नागरिकांची फसवणूक झाल्याचा संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी फसवणूक झालेल्या नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर उपचाराने बरे झाल्याचा दावा करणाऱ्या नागरिकांचीही या प्रकरणी चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. संबंधित व्यक्ती खरेच रुग्ण होते का? किंवा त्यांचा भोंदू गडगेशी काही संबंध होता का? याचाही या प्रकरणी धुंडाळा घेण्यात येणार आहे. यामुळे संगमनेर तालुक्यात मोठी खळबळ माजली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे पोलिसांनी आता भोंदू राजेंद्र गडगेच्या आर्थिक व्यवहाराकडेही आपला मोर्चा वळवला आहे. भोंदू गडगेचे आर्थिक व्यवहार रडारवर अहिल्यानगरचे अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या माहितीनुसार, राजेंद्र गडगे व त्याच्या कुटुंबीयांच्या नावे संगमनेर, अहिल्यानगर, नेवासा व राहाता परिसरात तब्बल 13 मालमत्ता असल्याचे तपासात उघड झाले आहे. या मालमत्तांची माहिती मिळवण्यासाठी सब-रजिस्ट्रार कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला आहे. याशिवाय 10 वेगवेगळ्या बँकांमध्ये त्याची खातीही आढळली आहेत. त्यामुळे पोलिस त्याच्या आर्थिक व्यवहारांची कसून छाननी सुरू केली आहे. हे ही वाचा… विधान परिषद निवडणूक – राष्ट्रवादीत कोट्यवधींच्या ऑफरपासून व्हिडिओपर्यंत लॉबिंग:’एमएमडी’ फॅक्टर राबवण्याचीही मागणी महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका जागेसाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. एकूण 9 नियमित जागा आणि एका पोटनिवडणुकीसह 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *