Headlines

टिप्परच्या धडकेत अकोल्यातील तरुणाचा जागीच मृत्यू, दोघे जखमी:पारखेड फाट्याजवळ भीषण अपघात; दुचाकीला दिली धडक, चालक पसार




खामगाव-नांदुरा महामार्गावरील पारखेड फाट्याजवळ गुरुवारी (दि. २३) रात्री ९ वाजेच्या सुमारास टिप्पर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात अकोला येथील २४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्याचे अन्य दोन मित्र जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अकोला येथील तीन मित्र दुचाकीने भुसावळ येथे आपल्या मित्राला भेटण्यासाठी जात होते. दरम्यान, पारखेड फाट्याजवळ खदान रस्त्यावरून अचानक महामार्गावर आलेल्या टिप्परने (क्रमांक एमएच ३० ९२९७) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकी चालक प्रज्वल संजय माहूरकर (वय २४) याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टिप्पर चालक मदतीसाठी न थांबता वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. टिप्पर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात अकोला येथील याप्रकरणी पोलिस फरार टिप्पर चालकाचा कसून शोध घेत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एकाची प्रकृती गंभीर; टिप्पर चालक फरार अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेले अक्षय देवेंद्र राऊत, आशुतोष प्रभाकर काकड हे दोघे जखमी झाले. त्यापैकी आशुतोष काकड याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील उपचारासाठी अकोला येथे हलवण्याची प्रक्रिया सुरू होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *