Headlines

कॅप्सूलमधून ब्लेडचे तुकडे पत्नीला खायला दिले:पतीला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, पत्नी – मुलगा फितूर होऊनही वैद्यकीय पुराव्यांवर पुण्यातील न्यायालयाने दिला निकाल



चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला कॅल्शियमच्या गोळ्या असल्याचे भासवत कॅप्सूलमध्ये ब्लेडचे तुकडे भरून ते खाण्यास देत जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला न्यायालयाने ७ वर्षे सक्तमजुरी आणि ७० हजार रुपयांचा दंड ठोठावला. खटल्यादरम्यान खुद्द पत्नी आणि मुल

.

पोटात तीव्र वेदना, शौचावाटे बाहेर पडले ब्लेडचे तुकडे : ऑक्टोबर २०२३ मध्ये पीडित महिलेच्या पोटात अचानक असह्य वेदना सुरू झाल्या. दोन वेळा शौचावाटे ब्लेडचे तुकडे पडल्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी त्रास वाढल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोनोग्राफी आणि तपासणीत तिच्या पोटात ब्लेड अडकल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी ११ नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया करून तो तुकडा बाहेर काढला. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी तपास करत पती सोमनाथविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. आरोपी कुटुंबातील एकमेव कमावता घटक असून पत्नी व मुलगा आजही त्याच्यावरच अवलंबून आहेत, असा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. कोर्टाने कुटुंब आणि अवलंबित्व लक्षात घेऊन जन्मठेपेऐवजी ७ वर्षांची शिक्षा सुनावली.

पत्नी व मुलाने न्यायालयात फिरवली साक्ष

सुनावणीदरम्यान पत्नीने पतीविरोधातील सर्व आरोप फेटाळले आणि “आमच्यातील वाद मिटले आहेत,” असा दावा केला. मुलानेही वडिलांविरोधात साक्ष देण्यास नकार दिला. मात्र, सरकारी वकील ॲड. पाठक यांनी ७ साक्षीदार तपासत जोरदार युक्तिवाद केला: “हा तुकडा अन्ननलिका किंवा आतड्याला छेद देऊन अंतर्गत रक्तस्रावाने महिलेचा जीव घेऊ शकला असता,” अशी ठाम साक्ष डॉक्टरांनी दिली. कौटुंबिक दबाव आणि भीतीपोटी पत्नीने साक्ष बदलली असली, तरी संपूर्ण साक्ष नाकारता येत नाही. वैद्यकीय पुरावे वैज्ञानिक सत्य मांडत असल्याचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *